Amazon Great Republic Day Sale 2024 ची तारीख जाहीर, प्रीमियम स्मार्टफोन्सवर मिळेल जबरदस्त Discount। Tech News 

Amazon Great Republic Day Sale 2024 ची तारीख जाहीर, प्रीमियम स्मार्टफोन्सवर मिळेल जबरदस्त Discount। Tech News 
HIGHLIGHTS

Amazon Great Republic Day Sale 2024 ची सेल डेट जाहीर

Amazon ने या सेलसाठी SBI बँकेसोबत पार्टनरशिप केली आहे.

सेलदरम्यान अनेक प्रीमियम स्मार्टफोन्सवर प्रचंड डिस्काउंट मिळणार आहे.

Amazon Great Republic Day Sale 2024 ची सेल डेट अखेर कंपनीने जाहीर केली आहे. ई-कॉमर्स दिग्गज कंपनीने काही काळापूर्वी या सेलची घोषणा केली होती. सेलची डेडिकेटेड मायक्रोसाइट देखील लाईव्ह झाली आहे. त्यानंतर, आता कंपनीने या वर्षातील आपल्या पहिल्या सेलची तारीख जाहीर केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सेलदरम्यान विविध ब्रँडचे स्मार्टफोन्स मोठ्या डिस्काउंट ऑफरसह खरेदी करता येतील.

हे सुद्धा वाचा: BSNL चा सुपर प्लॅन! 1 महिन्यासाठी इंटरनेट Free, केवळ ‘या’ वापरकर्त्यांना मिळेल लाभ। Tech News

एवढेच नाही तर, बँक कार्ड ऑफर, नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ देखील सेलमध्ये उपलब्ध असेल. Amazon ने या सेलसाठी SBI बँकेसोबत पार्टनरशिप केली आहे. तसेच, नेहमीप्रमाणे Amazon Prime सदस्यांना 1 दिवस आधी सेलचा लाभ घेता येईल.

Amazon Great Republic Day Sale 2024 सेल डेट

वर सांगितल्याप्रमाणे, Amazon Great Republic Day Sale 2024 ची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा सेल 14 जानेवारी 2024 पासून सुरू होईल. आम्ही सांगितल्याप्रमाणे, ई-कॉमर्स कंपनीने या सेलसाठी SBI बँकेसोबत पार्टनरशिप केली आहे. त्यामुळे, SBI बँक कार्ड वापरकर्त्यांना प्रत्येक खरेदीवर स्वतंत्र 10% सूट ऑफरचा लाभ मिळेल.

सेलदरम्यान अनेक प्रीमियम स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट मिळणार आहे. चला तर मग बघुयात या यादीत तुमच्या आवडत्या स्मार्टफोनवर तुम्हाला किती प्रमाणात बचत करता येणार आहे:

iQOO 12 Camera

iQOO 12

लेटेस्ट iQOO 12 स्मार्टफोन कंपनीने अलीकडेच लाँच केला होता. हा फोन Amazon सेलमध्ये XX,XX9 रुपये किमतीला खरेदी केला जाऊ शकतो. या फोनची किंमत 52,999 रुपये आहे, ज्यामध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनमध्ये 50MP + 50MP + 64MP कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील उपलब्ध आहे.

Samsung Galaxy S23

Samsung Galaxy S23 सिरीज ही प्रिमीयम विभागातील सर्वात पॉप्युलर सिरीज आहे. Samsung Galaxy S23 फोनची किंमत नुकतीच 10 हजार रुपयांनी कमी झाली आहे. किमतीत कपात केल्यानंतर, तुम्हाला हा फोन XX, XX9 रुपयांमध्ये खरेदी करू शकाल. तसेच, या फोनसह तुम्हाला सेलदरम्यान अनेक ऑफर्सचा लाभ देखील घेता येईल.

ONEPLUS 11R IN AMAZON REPUBLIC DAY SALE
ONEPLUS 11R

OnePlus 11R

OnePlus 11R फोनची किंमत 39,999 रुपये इतकी आहे. परंतु तो XX,XX9 रुपयांच्या सेलमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. सेलदरम्यान तुम्ही SBI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास तुम्हाला 10% सूट मिळेल.

iPhone 13

लोकप्रिय iPhone 13 ची ऑफर देखील या मायक्रोसाइटवर लाईव्ह करण्यात आली आहे. या फोनची किंमत 59,900 रुपये आहे, परंतु सेलदरम्यान हा फोन XX,XX9 रुपयांना खरेदी करता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फोनमध्ये 6.1 इंच लांबीचा डिस्प्ले, 12MP बॅक कॅमेरा आणि A15 बायोनिक चिप आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo