Amazon Great Indian Festival Sale 2024 अखेर प्राईम मेम्बर्ससाठी सुरु, महागड्या स्मार्टफोन्सवर Best डील्स उपलब्ध

Updated on 26-Sep-2024
HIGHLIGHTS

बहुप्रतीक्षित महासेल Amazon Great Indian Festival Sale 2024 प्राईम मेम्बर्ससाठी सुरु

Amazon सेलदरम्यान महागड्या स्मार्टफोन्सवर अप्रतिम सवलती उपलब्ध

Apple चा बेस्ट सेलिंग स्मार्टफोन iPhone 13 या सेलदरम्यान मोठ्या सवलतीसह उपलब्ध

प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon चा बहुप्रतीक्षित महासेल Amazon Great Indian Festival Sale 2024 अखेर प्राईम मेम्बर्ससाठी सुरु झालेला आहे. अर्थातच Amazon च्या इतर सर्व सदस्यांसाठी हा सेल उद्या 27 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार आहे. एका दिवसाआधी प्राईम मेम्बर्सना या सेलचा लाभ घेता येणार आहे. सेलदरम्यान स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक आयटम्स, होम अप्लायन्सेस, ब्युटी आणि फॅशन इ. सर्व श्रेणींच्या प्रोडक्ट्सवर प्रचंड सूट आणि आकर्षक ऑफर्स मिळतील. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Amazon Great Indian Festival Sale 2024 मधील बेस्ट स्मार्टफोन डील्सबद्दल सांगणार आहोत.

Also Read: Vivo V40e 5G: बहुप्रतीक्षित फोन 50MP सेल्फी कॅमेरासह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व फीचर्स

iPhone 13

Apple चा सर्वात लोकप्रिय आणि बेस्ट सेलिंग स्मार्टफोन iPhone 13 या सेलदरम्यान मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. iPhone 13 ची किंमत 59,900 इतकी आहे. मात्र, सेलदरम्यान हा स्मार्टफोन 39,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. या डीलला Amazon सेलदरम्यान ‘King of all Deals’ असे संबोधले जात आहे. या फोनसह बँक ऑफर्स, सहज खरेदी करण्यासाठी EMI सुविधा आणि एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहेत. हा फोन प्रोडक्ट रेड, ब्लु, ग्रीन, इ. सहा कलरसह उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

OnePlus 12R

फ्लॅगशिप किलरचा OnePlus 12R हा कंपनीचा नवा स्मार्टफोन मॉडेल गेल्या जानेवारी महिन्यात लाँच करण्यात आला आहे. OnePlus 12R ची किंमत 45,998 इतकी आहे. मात्र, सेलदरम्यान हा स्मार्टफोन 40,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. या फोनसह बँक ऑफर्स, सहज खरेदी करण्यासाठी EMI सुविधा आणि एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहेत. हा फोन कूल ब्लु, आयर्न ग्रे, सनसेट ड्यून कलरसह उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

Samsung Galaxy S23 Ultra 5G

Samsung चा Samsung Galaxy S23 Ultra 5G फोन कंपनीचा आकर्षक लुकसह येणारा प्रीमियम स्मार्टफोन आहे. Samsung Galaxy S23 Ultra 5G ची किंमत 1,49,999 इतकी आहे. मात्र, सेलदरम्यान हा स्मार्टफोन 74,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. या फोनसह बँक ऑफर्स, सहज खरेदी करण्यासाठी EMI सुविधा आणि एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहेत. हा फोन क्रीम, ग्रीन आणि फँटम ब्लॅक कलरसह उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

OnePlus Nord 4 5G

OnePlus चा OnePlus Nord 4 5G फोन कंपनीने अलीकडेच लाँच केला आहे. OnePlus Nord 4 5G ची किंमत 30,999 रुपये इतकी आहे. मात्र, सेलदरम्यान हा स्मार्टफोन 29,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. या फोनसह बँक ऑफर्स, सहज खरेदी करण्यासाठी EMI सुविधा आणि एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहेत. हा फोन मर्क्युरीयल सिल्वर, ओयासिस ग्रीन आणि ऑसबिडियन मिडनाईट कलरसह उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा. वरील सर्व स्मार्टफोन्सच्या किमती सेलदरम्यान जवळपास बदलत राहतील.

डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :