Amazon Great Indian Festival Sale मध्ये iPhones वर मिळेल भारी डिस्काउंट, 40 हजारांहून कमी किमतीत खरेदी करा। Tech News

 Amazon Great Indian Festival Sale मध्ये iPhones वर मिळेल भारी डिस्काउंट, 40 हजारांहून कमी किमतीत खरेदी करा। Tech News
HIGHLIGHTS

Amazon Great Indian Festival Sale 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार

iPhone 13 चा बेस व्हेरिएंट आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी करता येईल.

iPhone 15 लाँच केल्यानंतर Apple ने अधिकृतपणे iPhone 13 ची किंमत कमी केली आहे.

Amazon ने त्याच्या आगामी Great Indian Festival Sale ची तारीख जाहीर केली आहे. दरम्यान, Amazon ने सेलचे काही डिल्स उघड केले आहेत, जे 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. आता कंपनीने पुष्टी केली आहे की, iPhone 13 चा बेस व्हेरिएंट 40,000 रुपयांपेक्षा कमी म्हणजेच आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी करता येईल. त्याच प्रमाणे मॅकबुक एअरच्या किमतीतही मोठी कपात करण्यात आली आहे.

#image_title

iPhone 13 वरील डिल

iPhone 13 स्मार्टफोन भारतात 2021 मध्ये 79,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनला गेल्या काही महिन्यांमध्ये खूप सवलत मिळाली आहे. त्यानंतर, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दरम्यान, हा डिव्हाइस 40,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असेल, अशी हिंट देखील देण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, iPhone 15 लाँच केल्यानंतर Apple ने अधिकृतपणे iPhone 13 ची किंमत 59,900 रुपये इतकी कमी केली आहे.

#image_title

त्यानंतर, तुम्हाला सेलदरम्यान खरेदी व्यवहारांवर SBI बँक कार्ड वापरावे लागेल. एवढेच नाही, तर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून हा स्मार्टफोन 39,999 रुपयांपेक्षा कमी प्रभावी किंमतीत खरेदी करू शकता. तुम्ही वरील इमेजमध्ये बघू शकता की, iPhone 13 वर डिस्काउंट कशाप्रकारे मिळेल.

MacBook Air M1 वरही मोठी सूट

MacBook Air M1 हा डिवाइस 92,900 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र, आता Amazon वर फक्त हा डिवाइस केवळ 69,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे ते भारतात सिलिकॉनने सुसज्ज असलेले Apple चे सर्वात परवडणारे MacBook बनले आहे. Apple MacBook Air चे बेस मॉडेल 8GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेजसह येते.

स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाल्यास, मॅकबुक एअर पॅसिव्ह कूलिंग सिस्टम आणि फॅनलेस डिझाइनसह येते आणि त्यात प्रीमियम मेटल युनिबॉडी डिझाइन, टच आयडी आणि सिझर-की मेकॅनिझमसह नवीन कीबोर्ड देखील आहे. हे Apple M1 चिपसह सुसज्ज आहे, जे 8-कोर CPU आणि 7-कोर GPU सह पेयर केले गेले आहे. जर तुम्ही नवीन परवडणारे मॅकबुक शोधत असाल, तर M1 MacBook Air हा एक उत्तम पर्याय आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo