Amazon ने त्याच्या आगामी सेल दरम्यान उपलब्ध असलेल्या काही डील्सचे अनावरण केले.
आगामी Amazon सेलमध्ये SBI कार्ड्सवर 10% सूट देखील दिली जाणार आहे.
Amazon युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आगामी Amazon Great Freedom Festival सेलचा टीझर समोर आला आहे. अलीकडेच Amazon ने प्राईम मेम्बर्ससाठी असणारा दोन दिवसांचा प्राईम डे सेल आयोजित केला होता. जर तुम्ही त्या सेलचा लाभ घेतला नसेल, तर अजिबात काळजी करू नका. कारण Amazon Great Freedom Festival लवकरच तुमच्यासाठी आयोजित केला जाणार आहे. या सेलची तारीख अद्याप उघड करण्यात आलेली नाही.
परंतु ई-कॉमर्स कंपनी Amazon ने त्याच्या आगामी सेल दरम्यान उपलब्ध असलेल्या काही डील्सचे अनावरण केले आहे. कंपनी दरवर्षी या सेलचे आयोजन करते, यावर्षीही स्वातंत्र्यदिनाचे समारंभ लक्षात घेऊन हा कार्यक्रम आखला जात आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात आगामी Amazon सेलमध्ये मिळणारे अपेक्षित डील्स-
Amazon Great Freedom Festival Sale मध्ये स्मार्टफोन्सवर मिळणार भारी सवलती
वर सांगितल्याप्रमाणे, Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलचे टीझर पेज समोर आले आहे. सेलमध्ये SBI कार्ड्सवर 10% सूट देखील दिली जाणार आहे.तर, नेहमीप्रमाणे प्राइम सदस्यांसाठी लवकर प्रवेश सुविधा देखील असेल. त्याबरोबरच, सेल दरम्यान टॉप ब्रँड्सच्या सुप्रसिद्ध फोनवर उत्तम ऑफर आणि सूट मिळणार आहेत. तसेच, कूपन सूट म्हणून 10,000 रुपयांपर्यंत सूट, एक्सचेंज ऑफरवर 50,000 रुपयांपर्यंत सूट आणि इतर ऑफर देखील उपलब्ध असतील.
जर आपण OnePlus फोन्सबद्दल बोललो तर, OnePlus Nord CE 4 Lite, OnePlus Nord 4, OnePlus Nord CE 4, OnePlus Open, OnePlus 12R आणि OnePlus 12 वर ऑफर्स उपलब्ध असतील. या उपकरणांची डील किंमत येत्या काही दिवसांत उघड होण्याची अपेक्षा आहे. सेल जसजशी जवळ येईल, तसतशी या डील्सची खरी माहिती समोर येऊ लागेल.
iQOO Z9 Lite 5G, iQOO 12 5G, iQOO Neo 9 Pro, iQOO Z7 Pro, iQOO Z9 आणि iQOO Z9x देखील Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल दरम्यान बंपर ऑफरसह उपलब्ध असतील.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi च्या Redmi 13 5G, Redmi Note 13 Pro, Redmi 12 5G, NOte 13 Pro+, Xiaomi 14 आणि इतरांवरही लक्षणीय सवलत असेल.
साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Samsung चे लेटेस्ट Galaxy M15, Galaxy A35 सारखे स्मार्टफोन्स सेलदरम्यान स्वस्तात उपलब्ध असतील.
तसेच, या सेलदरम्यान Oppo, Poco आणि Realme चे लेटेस्ट आणि पॉवरफुल स्मार्टफोन्सदेखील मोठ्या सवलतीसह उपलब्ध असण्याची शक्यता आहे.
जर तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यास इच्छुक असाल तर, आगामी Amazon सेलदरम्यान उपलब्ध असणाऱ्या डील्स तुमच्यासाठी चांगला पर्याय घेऊन येतील.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.