iQOO चे मस्त गेमिंग फोन Amazon GIF Sale मध्ये स्वस्तात उपलब्ध, जाणून घ्या Discount ऑफर। Tech News

Updated on 19-Oct-2023
HIGHLIGHTS

Amazon Great Indian Festival Sale मध्ये iQOO च्या गेमिंग स्मार्टफोनवर डिस्काउंट

फोनच्या खरेदीवर SBI कार्डवर 1,000 रुपयांची सवलत मिळेल.

पुढील स्मार्टफोनमध्ये गेमिंगसाठी अल्ट्रा गेमिंग मोड उपलब्ध आहे.

Amazon Great Indian Festival Sale मध्ये तुम्ही iQOO चे गेमिंग स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो, 8 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेल्या या फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये अनेक ब्रँडचे स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गृहोपयोगी वस्तू इत्यादींच्या खरेदीवर ऑफर्सचा वर्षाव सुरु आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला लेटेस्ट iQOO गेमिंग स्मार्टफोन्सवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. चला बघुयात सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ब्रँडच्या उत्तम पर्यायांची यादी-

iQOO Neo 7 Pro 5G

या फोनच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज बेस व्हेरिएंटची किंमत 32,999 रुपये आहे. फोनच्या खरेदीवर SBI कार्डवर 1,000 रुपयांची सवलत मिळेल. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन Android 13 वर आधारित FuntouchOS 13 वर काम करतो. फोनमध्ये अल्ट्रा गेमिंग मोड देखील उपलब्ध आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग फीचर आहे. येथून खरेदी करा

iQOO Z6 Lite 5G

iQOO Z6 Lite 5G ची किंमत 13,999 रुपये आहे. फोनच्या खरेदीवर SBI कार्डवर 1,000 रुपयांची सवलत मिळेल. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 Gen 1 प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित FuntouchOS 12 वर काम करतो.फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग फीचर आहे. येथून खरेदी करा

iQOO 11 5G

iQOO 11 5G चा 8GB RAM + 256GB स्टोरेज बेस व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे. फोनच्या खरेदीवर SBI कार्डवर 1,000 रुपयांची सवलत मिळेल. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये गेमिंगसाठी अल्ट्रा गेमिंग मोड उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :