Amazon GIF Sale दरम्यान महागडे फोल्डेबल फोन्स निम्म्या किमतीत उपलब्ध, पहा Best ऑफर्स

Updated on 04-Oct-2024
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2024 सेल दरम्यान फोल्डेबल फोन सवलतीत उपलब्ध

सेलमध्ये बँक कार्ड डिस्काउंट ऑफर आणि डिस्काउंट कूपनचे लाभ देखील मिळणार आहे.

Samsung फोल्डेबल फोन्सवर 15,000 रुपयांचे डिस्काउंट ऑफर्स उपलब्ध

सध्या तरुणाईमध्ये फोल्डेबल स्मार्टफोन्सचे ट्रेंड सुरू आहे. हे फोन्स हाय बजेट श्रेणीत येत असल्यामुळे ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम बजेट तपासावे लागेल. मात्र, Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2024 सेल दरम्यान, तुम्ही मोठ्या सवलतींसह सर्वात महागडे स्मार्टफोन घरी आणू शकता. सेलदरम्यान, फोल्डेबल स्मार्टफोनवर मोठ्या सवलतीच्या ऑफर देण्यात येत आहेत. सेलमध्ये तुम्हाला बँक कार्ड डिस्काउंट ऑफर आणि डिस्काउंट कूपनचे लाभ देखील मिळणार आहे. येथे आम्ही तुमच्यासाठी काही निवडक स्मार्टफोन्सची यादी तयार केली आहे.

Oneplus Open

Oneplus Open हा फ्लॅगशिप किलरचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत 1,39,999 रुपये सूचीबद्ध आहे. परंतु Amazon सेल दरम्यान हा फोन केवळ 99,999 रुपयांना सूचिबद्ध केला जाईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात बँक ऑफर्स, EMI ऑप्शन्स इ. सुविधा मिळतील. या फोनमध्ये 7.82 इंच प्राइमरी आणि 6.31 इंच कव्हर डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा आहे. येथून खरेदी करा

Samsung Galaxy Z Fold6 5G

Samsung Galaxy Z Fold6 5G फोनचा 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon सेल दरम्यान 1,64,998 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या फोनवर 15,000 रुपयांचे डिस्काउंट ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. 50 MP + 12 MP + 10 MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 10 MP फ्रंट कॅमेरा फोनच्या मागील बाजूस उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

TECNO Phantom V Fold 5G

TECNO Phantom V Fold 5G हा या यादीतील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. या फोनचा 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon सेल दरम्यान केवळ 69,999 मध्ये खरेदी केला जाऊ शकतो. कंपनीने या फोनवर 5000 रुपयांचे डिस्काउंट कूपन दिले आहे. बँक कार्डद्वारे फोनवर 1250 रुपयांची सूटही मिळत आहे. फोन MTK Dimensity 9000+ प्रोसेसरने सुसज्ज आहे. 50MP मुख्य + 13MP अल्ट्रा-वाइड रियर कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा फोनच्या मागील बाजूस उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :