Amazon चा आगामी GIF सेल 2023 या महिन्याच्या 8 तारखेपासून सुरू होणार आहे. नेहमीप्रमाणे, प्राईम मेम्बर्ससाठी सेल एक दिवसाआधी म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी सुरु होईल. सेलदरम्यान स्मार्टफोन, लॅपटॉप, वेअरेबल्स इ. अनेक गॅजेट्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, SBI कार्डधारकांना 10% अतिरिक्त सूट मिळणार आहे. मात्र, यंदा सेल सुरु होण्यापूर्वीच Amazon ने आगामी सेलमधील काही नवीनतम स्मार्टफोन डील उघड केले आहेत. बघा सविस्तर-
Honor 90 ची खरी किंमत 47,999 रुपये आहे. मात्र, Amazon च्या आगामी सेल दरम्यान Honor 90 5G स्मार्टफोन 29,999 रुपये सवलतीच्या किमतीत उपलब्ध होईल. होय, सेलदरम्यान स्मार्टफोन 33,999 रुपयांच्या सेल प्राईसमध्ये असेल. यावर, 4000 रुपयांची बँक सूट मिळणार आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
iQOO Z7 Pro ची मूळ किंमत 26,999 रुपये आहे. मात्र,आगामी सेलमध्ये सर्व बँक ऑफर्ससह हा स्मार्टफोन 21,499 रुपयांना उपलब्ध होईल. तर डिव्हाइस 6.74-इंच फुल HD रिझोल्यूशनसह येते आणि कार्यक्षमतेसाठी MediaTek Dimensity 7200 चिपसेटद्वारे समर्थित आहे. फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह समर्थित आहे. फोनबद्दल अधिक माहितीसाठी क्लिक करा.
OnePlus चा हा स्मार्टफोन अलीकडेच लाँच झाला आहे, स्मार्टफोन GIF दरम्यान 19,999 रुपयांना लिस्ट केला जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, सर्व बँक सवलती आणि कूपन सवलतींनंतर, त्याची प्रभावी किंमत 17,999 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. या फोनमध्ये 108MP ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टम आहे. फोनबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा!
Amazon सेल दरम्यान Samsung Galaxy M34 5G स्मार्टफोन 24,499 रुपयांऐवजी 16,499 रुपयांना उपलब्ध होणार आहे. याव्यतिरिक्त, 1500 रुपयांच्या बँक सवलतीनंतर, त्याची प्रभावी किंमत 14,999 रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. कंपनी या फोनसाठी 5 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स आणि 4 वर्षांचे OS अपग्रेड देत आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
सेलदरम्यान Redmi 12 5G चा 4GB + 128GB व्हेरिएंट सर्व बँक ऑफरनंतर 10,800 रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. यात 6.79-इंच लांबीचा FHD+ 90Hz LCD डिस्प्ले आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. त्याबरोबरच, फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी आहे, जी 18W स्पीडने फास्ट चार्ज होते. फोनबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.