Amazon GFF Sale मध्ये मिड रेंज स्मार्टफोन झाले स्वस्त, OnePlus, Realme सारख्या स्मार्टफोन्सवर बंपर Discount

Updated on 07-Aug-2024
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल 11 ऑगस्टपर्यंत लाईव्ह असेल.

OnePlus 12 फोनवर तुम्हाला सेलदरम्यान तब्बल 6000 रुपयांची सूट दिली जाईल.

Realme GT 6T 5G फोनवर 4000 रुपयांची बचत करण्याची संधी

मंगळवारपासून Amazon ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल भारतात सुरू झाला आहे. हा सेल 11 ऑगस्टपर्यंत LIVE राहणार आहे. या सेल दरम्यान विविध ब्रँडच्या प्रोडक्ट्सवर बंपर डील आणि डिस्काउंट ऑफर दिले जात आहेत. जर तुम्ही स्वत:साठी नवीन आणि मिड रेंज स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा सेल तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. सेल दरम्यान, तुम्ही OnePlus, Realme सारख्या प्रसिद्ध ब्रँड्सचे स्मार्टफोन्स मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

OnePlus 12

फ्लॅगशिप किलरचा OnePlus 12 फोन कंपनीने भारतात या वर्षीच्या सुरुवातीला लाँच केला. या फोनचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon सेल दरम्यान 59,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. या फोनवर SBI बँक कार्डद्वारे थेट 6000 रुपयांची सूट दिली जात आहे. या फोनचा कॅमेरा अप्रतिम आहे. होय, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP+64MP+48MP रियर कॅमेरा आहे. पॉवरसाठी या फोनची बॅटरी 5400mAh आहे, जी 100W फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येते. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Realme GT 6T 5G

Realme GT 6T 5G फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon सेल दरम्यान 30,998 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. Amazon सेलदरम्यान या फोनवर 4000 रुपयांचे डिस्काउंट कूपन दिले जात आहे. तसेच, ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे या फोनवर 1000 रुपयांची सूट देखील उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, या फोनवर बँक ऑफर्ससह EMI आणि एक्सचेंज ऑफर्स देखील मिळतील. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

HONOR 200 5G

HONOR 200 5G फोनचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon सेल दरम्यान 33,998 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 1000 रुपयांचे डिस्काउंट कूपन उपलब्ध आहे. त्याबरोबरच, बँक कार्डद्वारे फोनसाठी पेमेंट व्यवहार केल्यास तुम्हाला 3000 रुपयांची सूट दिली जात आहे. तर, सहज खरेदीसाठी तुम्हाला EMI आणि एक्सचेंज ऑफरचा पर्याय देखील मिळेल. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 50MP+50MP+12MP बॅक कॅमेरा आणि सेल्फीसाठी, 50MP सेल्फी कॅमेरा आहे. अधिक माहिती आणि खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :