ई-कॉमर्स वेबसाइट Amazon India ने 9 ऑगस्ट पासून 12 ऑगस्ट पर्यंत Amazon Freedom Sale चे आयोजन केले आहे. OnePlus ने सेल मध्ये आपल्या ऑफर्स पण सादर केल्या आहेत. अमेजॉन फ्रीडम सेल मध्ये जे ग्राहक OnePlus 6 स्मार्टफोन विकत घेतील त्यांना 6 महिन्यांसाठी नो कॉस्ट EMI चा पर्याय मिळत आहे, हा पर्याय अमेजॉन इंडिया आणि OnePlus ऑफलाइन चॅनल्स वर पण उपलब्ध होईल.
सहा महिन्याच्या नो कॉस्ट EMI साठी प्रतिमाह 5,833 रुपयांचा EMI द्यावा लागेल आणि ग्राहकांना जुना फोन्स एक्सचेंज केल्यास 2,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट पण मिळेल. अमेजॉन कडून Oneplus 6 विकत घेतल्यास ग्राहकांना SBI डेबिट आणि क्रेडिट वर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट पण मिळत आहे. Amazon फ्रीडम सेल मधून OnePlus 6 विकत घेतल्यास ग्राहकांना OnePlus ब्रॅण्ड च्या एक्सेसरीज वर 20 टक्क्यांचा डिस्काउंट पण मिळेल.
एक्सेसरीज वर हा डिस्काउंट OnePlus इंडिया च्या वेबसाइट आणि OnePlus एक्सक्लूसिव ऑफलाइन चॅनल्स वर मिळेल. विशेष म्हणजे OnePlus नुसार जे यूजर्स 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान ऑफरचा लाभ घेऊ शकणार नाहीत ते 15 ऑगस्टच्या आधी खास OnePlus च्या ऑफलाइन चॅनल्स वरून या ऑफर चा लाभ घेऊ शकतात.
OnePlus 6 च्या स्पेसिफिकेशंस बद्दल बोलायचे झाले तर डिवाइस मध्ये एक 6.28-इंचाचा FHD+ 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले आहे. हि एक AMOLED स्क्रीन आहे जिचे पिक्सेल रेजोल्यूशन 2280×1080 पिक्सेल आहे. याला स्लिम बॉडी डिजाइन देण्यात आली आहे. ग्लास बॅक डिवाइसच्या रेडियो ट्रांसमिशनला वाढवते आणि स्क्रीन ला गोरिला ग्लास 5 ने प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो 16-मेगापिक्सल च्या एका सेंसर व्यतिरिक्त 20-मेगापिक्सल च्या अजून एका सेंसर चा कॉम्बो आहे, याला 2X lossless झूम आणि पोर्ट्रेट मोड शॉट क्षमते सह सादर करण्यात आला आहे. तसेच या डिवाइस मध्ये एक 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण देण्यात आला आहे. OnePlus 6 मध्ये डिवाइस च्या बॅकला वर्टीकल डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि कॅमेरा सेटअप च्या खाली एक फिंगरप्रिंट सेंसर आहे.
इतर फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर डिवाइस मध्ये 3300mAh ची बॅटरी आहे आणि हा डॅश चार्ज सपोर्ट सह येतो. तसेच हा डिवाइस वॉटर रेसिस्टेंट बनवण्यात आला आहे जो याला स्प्लॅश प्रुफ बनवतो आणि या डिवाइस मध्ये 3.5mm हेडफोन जॅक पण देण्यात आला आहे. OnePlus 6 एंड्राइड ओरियो वर आधारित कंपनी च्या ऑक्सीजन OS वर चालत आहे.