Amazon Echo Spot: लेटेस्ट स्मार्ट अलार्म क्लॉक Alexa Voice सपोर्टसह भारतात लाँच, पहा किंमत आणि विशेषता

Updated on 09-Jan-2025
HIGHLIGHTS

लेटेस्ट Amazon Echo Spot स्मार्ट अलार्म क्लॉक भारतात लाँच

Amazon Echo Spot उपकरण लाँच ऑफरअंतर्गत 6,499 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध

हे डिवाइस Amazon च्या Alexa-सक्षम इको डिव्हाइसचे नवीनतम एडिशन आहे.

Amazon Echo Spot: लेटेस्ट Amazon Echo Spot स्मार्ट अलार्म क्लॉक भारतात लाँच करण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे Amazon च्या Alexa-सक्षम इको डिव्हाइसचे नवीनतम एडिशन आहे, जो अनेक ऍडव्हान्स फिचरसह येतो. या स्मार्ट अलार्म क्लॉकमध्ये अनेक प्रकारचे कलरफुल डिस्प्ले उपलब्ध आहेत. तसेच, यात अलेक्सा व्हॉइस असिस्टंटचा सपोर्ट देखील आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Amazon Echo Spot ची किंमत, उपलब्धता आणि संपूर्ण तपशील-

Also Read: Smartphone Tips: फोनमधील ‘हे’ फिचर तुमच्या मित्र-मैत्रिणींचे Birthday विसरू देणार नाही, आताच करा ऍक्टिव्ह

Amazon Echo Spot ची किंमत आणि उपलब्धता

Amazon ने भारता Amazon Echo Spot उपकरण 6,499 रुपयांच्या किमतीत लाँच केले आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, ही किंमत फक्त लाँच ऑफरपर्यंत मर्यादित आहे. लाँच ऑफर संपल्यानंतर, हे डिवाइस तुम्हाला Amazon वरून 8,999 रुपयांना खरेदी करता येईल. हे डिवाइस ब्लॅक आणि ब्लु या दोन आकर्षक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. Buy From Here

Amazon Echo Spot चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

लेटेस्ट Amazon Echo Spot स्मार्ट अलार्म क्लॉकमध्ये 2.82-इंच लांबीचा टच-स्क्रीन डिस्प्ले मिळतो. या डिस्प्लेमध्ये टाइम, अलार्म, वेदर आणि म्युझिक अशी माहिती दिसते. एवढेच नाही तर, या स्मार्ट क्लॉकमध्ये कस्टमायझेशनचा पर्याय देखील देण्यात आला आहे. होय, यात 6 वेगवेगळ्या थीम समाविष्ट आहेत. या थीममध्ये ब्लु, लाइम, मॅजेंटा, ऑरेंज, टील आणि वॉयलेट कलर ऑप्शन उपलब्ध आहेत.

या डिव्हाइसमध्ये 1.73-इंच लांबीचा फ्रंट-फायरिंग स्पीकर आहे, जो वापरकर्त्यांना एक उत्तम ऑडिओ एक्सपेरियन्स देईल. त्याबरोबरच, या डिवाइसमध्ये तुम्ही म्युझिक, पॉडकास्ट आणि ऑडिओबुक्सचा आनंद घेऊ शकता. Amazon Echo Spot मध्ये, तुम्ही दररोज वाजणारा अलार्म देखील कस्टमाइझ करू शकता. तुम्ही व्हॉइस कमांडद्वारे तुमचे आवडते गाणे देखील अलार्म म्हणून सेट करण्यास सक्षम असाल.

कंपनीने एक उदाहरण दिले आहे की, तुमचे आवडते गाणे या अलार्ममध्ये सेट करण्यासाठी, तुम्ही “Alexa, भक्तीगीतांसह सकाळी 7 वाजताचा आठवड्याचा अलार्म लाव.” सारखी व्हॉइस कमांड देऊ शकता. याव्यतीरिक्त, यात तुम्हाला चार वेगवेगळ्या अलार्म साउंडचा पर्याय मिळेल. ज्यामध्ये ऑरोरा, डेब्रेक, एंडेव्हर आणि फ्लटर समाविष्ट आहेत. तुम्ही टॅप करून किंवा व्हॉइस कमांडने अलार्म बंद देखील करू शकता.

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :