Nokia च्या स्वस्त फोनवर मिळतेय आणखी सूट, बघा अप्रतिम ऑफर

Nokia च्या स्वस्त फोनवर मिळतेय आणखी सूट, बघा अप्रतिम ऑफर
HIGHLIGHTS

Amazon वर दररोज डील ऑफ द डे ऑफर

Nokia C12 वर मिळतेय मस्त ऑफर

ICICI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर 10% झटपट सूट

Amazon वर दररोज डील ऑफ द डे ऑफर दिली जाते. यासह तुम्हाला एखाद्या प्रोडक्टवर बरेच ऑफर्स दिले जातात. आज ही ऑफर Nokia C12 वर दिली जात आहे. फोन सेकंडरी फोन म्हणून किंवा तुमच्या पालकांना गिफ्ट देण्यासाठी खरेदी उत्तम पर्याय ठरेल. या फोनची किंमत 6,000 रुपयांपेक्षा कमी आहे. आता Nokia C12 आणखी कमी किमतीत मिळेल. बघुयात ऑफर्स – 

Nokia C12 वरील ऑफर्स 

Nokia C12च्या 2GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे. मात्र, Amazonवर फोन 5,999 रुपयांमध्ये सूचिबद्ध आहे. सवलतीसह ही किंमत देण्यात आली आहे.तुम्ही हा फोन इतर ऑफर्ससह खरेदी करू शकता. जसे की, EMI ऑफर्स किंवा बँक ऑफर्स. 

 EMI ऑप्शनसह तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल तर, दरमहा 287 रुपये द्यावे लागतील. त्याबरोबरच, तुम्हाला ICICI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर 10% झटपट सूट दिली जाईल. याशिवाय 5,650 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. त्यामुळे तुम्हाला हा स्मार्टफोन अगदी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. येथून खरेदी करा

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

फोनमध्ये 6.3-इंच लांबीचा HD + डिस्प्ले मिळणार आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळणार आहे.  तसेच, या फोनमध्ये Android 12 Go Edition मिळेल. फोनमध्ये तुम्हाला 2GB रॅम मिळणार आहे, जी आणखी 2GB ने वाढवता येणार आहे. त्याबरोबरच, 64GB स्टोरेज देण्यात आले आहे,  जे मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देखील आहे. आकर्षक सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा फोनच्या समोरील बाजूस मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo