Amazon वर Blockbuster Value Days Sale सुरू, बेस्ट सेलिंग स्मार्टफोन्सवर 40% डिस्काउंट

Amazon वर Blockbuster Value Days Sale सुरू, बेस्ट सेलिंग स्मार्टफोन्सवर 40% डिस्काउंट
HIGHLIGHTS

आजपासून Amazon वर Blockbuster Value Days Sale सुरू

हा सेल 19 मेपासून ते 24 मे पर्यंत चालणार आहे.

अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर जोरदार म्हणजेच 40% पर्यंत सूट

आजपासून म्हणजेच 19 मेपासून Amazon वर Blockbuster Value Days Sale सुरू झाला आहे. Amazon सेलमध्ये iQOO, OnePlus, Samsung, Realme, Oppo आणि Xiaomi सह अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर जोरदार म्हणजेच 40% पर्यंत सूट दिली जात आहे. ही सेल 24 मे पर्यंत चालणार आहे. यासह बरेच बँक ऑफर्स आणि 8 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट EMI इ. लाभ मिळतील. 

iQOO Neo 7 5G वरील ऑफर 

Amazon Sale मध्ये iQOO Neo 7 5G स्मार्टफोनवर 1500 रुपयांची झटपट सूट उपलब्ध आहे. ही ऑफर HDFC बँकेच्या कार्ड पेमेंटवर उपलब्ध असेल. फोन 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजसह येणाऱ्या व्हेरिएंटची किमंत 29,999 रुपयांपासून सुरू होते.

OnePlus Nord CE 2 Lite 5G वरील ऑफर्स 

 OnePlus Nord CE 2 Lite 5G देखील सेलमध्ये स्वस्त मिळत आहे. 64MP मुख्य कॅमेरा असलेल्या या फोनमध्ये 8GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेज आहे. फोनची किंमत 18,999 रुपयांपासून सुरू होते. HDFC बँकेच्या कार्डांवर 1500 रुपयांपर्यंत सूट आहे.

Samsung Galaxy M14 5G वरील ऑफर्स 

Samsung Galaxy M14 5G मध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. त्याची किंमत 13,990 रुपयांपासून सुरू होते. फोन 6.6-इंच डिस्प्ले, 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. याशिवाय फोनमध्ये Exynos 1330 Octa Core प्रोसेसर देण्यात आला आहे. सेलदरम्यान, HDFC बँक ऑफर्समध्ये फोनवर 750 रुपयांची सूट आहे. 

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo