Xiaomi च्या 31 मे ला होणार्या इवेंट साठी आता फक्त काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत, पण लॉन्च जवळ असूनही या इवेंट मध्ये लॉन्च होणार्या डिवाइस इत्यादी बद्दल अफवा आणि लीक्स थांबत नाहीत. एक नवीन लीक जो चीनी सोशल मीडिया वेबसाइट वर दिसत आहे, तो हा आहे की Xiaomi या इवेंट मध्ये आपला अजून एक डिवाइस म्हणजे Xiaomi Mi 8 SE पण लॉन्च करू शकते. आता पर्यंत या डिवाइस बद्दल कोणतीच माहिती मिळाली नव्हती.
या नावाने तुम्हाला अॅप्पल च्या अफोर्डेबल सेगमेंट ची आठवण आली असेल. कारण iPhone SE बद्दल तर सर्वांनी ऐकले असेल आणि लवकरच कंपनी कडून या सीरीज चा नवीन डिवाइस iPhone SE 2 नावाने लॉन्च करेल अशा बातम्या आहेत. Xiaomi Mi 8 SE डिवाइस बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस एक लिमिटेड एडिशन च्या रुपात सादर केला जाऊ शकतो. हा डिवाइस एंड्राइडप्योर द्वारा समोर आला आहे, पण आधी हा वेइबो वर दिसला होता.
याव्यतिरिक्त या लॉन्च इवेंट मध्ये कंपनी कडून सादर करण्यात येणार्या एनिवर्सरी एडिशन बद्दल बोलायचे झाले तर कंपनी Mi 8 डिवाइस पण या इवेंट मध्ये लॉन्च करेल. या डिवाइस बद्दल आता पर्यंत खुप माहिती मिळाली आहे.
असे बोलले जात आहे की हा डिवाइस कंपनी कडून 6.2-इंचाच्या एका FHD+ 2280×1080 पिक्सल सह लॉन्च केला जाईल, फोन मध्ये एक नॉच असेल, याव्यतिरिक्त यात एक 19:9 आस्पेक्ट रेश्यो चा डिस्प्ले असेल, या डिवाइस मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट देण्यात आला आहे, फोन मध्ये तुम्हाला एक 6GB चा रॅम मिळत आहे, तसेच तुम्हाला यात 128GB ची इंटरनल स्टोरेज पण मिळत आहे.
फोन मध्ये फोटोग्राफी साठी एक 16 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा असेल, त्याचबरोबर यात तुम्हाला एक ड्यूल कॅमेरा याच्या बॅक वर मिळणार आहे, फोन मध्ये एक 20-मेगापिक्सल सह 16-मेगापिक्सल चा कॅमेरा कॉम्बो मिळत आहे, त्याचबरोबर फोन मध्ये एक 3,300mAh क्षमता असलेली बॅटरी Quick Charge 4.0 सह मिळू शकते.
अजून बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये सुरक्षेवर जास्त भर देण्यात आला आहे, हा डिवाइस कंपनी कडून एका अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह लॉन्च केला जाऊ शकतो. यासाठी एक विडियो पण लीक झाला आहे, ज्या वरून समजत आहे की याचा हा अनलॉक फीचर कसे काम करतो. पण याबद्दल जास्त माहिती याच्या लॉन्च च्या वेळी मिळेल.