कंपनी च्या या लिस्ट मध्ये 8 स्मार्टफोन्स आहेत ज्यांना नवीन OS अपडेट मिळेल.
Google ने काही दिवसांपूर्वी एंड्राइड पाई च्या उपलब्धते बद्दल घोषणा केली होती. त्यानंतर काही एंड्राइड स्मार्टफोन निर्मात्यांनी आपल्या डिवाइसेज साठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम अपडेट ची घोषणा केली आहे. या लिस्ट मध्ये नवीन नाव मोटोरोला चे जोडले गेले आहे, कंपनी ने त्या डिवाइसेज च्या नावाची घोषणा केली आहे ज्यांना एंड्राइड 9.0 पाई अपडेट मिळेल.
ही लिस्ट खुप छोटी आहे, ज्यात आठ स्मार्टफोन्सचा समावेश आहे. या स्मार्टफोंस मध्ये Moto Z3, Moto Z3 Play, Moto Z2 Force, Moto Z2 Play, Moto X4, Moto G6, Moto G6 Plus, आणि Moto G6 Play यांचा समावेश आहे.
निराशानजक बाब ही की कंपनी Moto E5 आणि Moto E5 Plus ला नवीन OS वर अपडेट करत नाही आहे. पण असेही होऊ शकते की वर सांगितलेले स्मार्टफोन्स या अपडेट च्या पहिल्या बॅच मध्ये असतील आणि बाकीच्या डिवाइसेज नंतर अपडेट दिला जाईल.
कंपनी ने अजूनतरी या डिवाइसेज साठी काही निश्चित वेळ दिलेली नाही ज्यावरून एंड्राइड 9.0 पाई अपडेट मिळण्याची तारीख समजले.