अल्काटेल X1 स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत १५,९९९ रुपये
हा डिवाइस ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 615 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
फ्लिपकार्टवर खरेदी करा अल्काटेल X1 स्मार्टफोन १५,९९९ रुपयात
अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा अल्काटेल X1 स्मार्टफोन १५,९९९ रुपयात
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी अल्काटेलने भारतात आपला नवीन फोन X1 लाँच केला आहे. कंपनीने भारतीय बाजारात आपल्या ह्या डिवाइसची किंमत १५,९९९ रुपये ठेवली आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन जो 4G LTE सपोर्टसह येतो. हा डिवाइस ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन वर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD AMOLED डिस्प्ले दिली आहे. ह्या डिस्प्लेला ड्रॅगनटेल ग्लास आणि गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह लाँच केले गेले आहे. हा डिवाइस ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 615 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
हेदेखील पाहा – झोलो वन HD रिव्ह्यू
ह्या डिवाइसमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे, जो LED फ्लॅशसह येतो. ह्या फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. हा देखील LED फ्लॅशसह देण्यात आला आहे. ह्यात वाय-फाय, ब्लूटुथ, GPS सारखी वैशिष्ट्ये दिली गेली आहेत. हा 2150mAH बॅटरीने सुसज्ज आहे.
हेदेखील वाचा – आज केवळ १ रुपयात मिळणार वनप्लस 3 चा VR हेडसेट
हेदेखील वाचा – लाँच झाला जगातील आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन, पाहा किती आहे ह्याची किंमत?