मोबाईल निर्माता कंपनी अल्काटेलने MWC 2016 मध्ये आपले तीन नवीन स्मार्टफोन्स अल्काटेल पॉप 4, पॉप 4 प्लस आणि पॉप 4S लाँच केले. अल्काटेल पॉप 4 पॉप 4 प्लस, पॉप 4S स्मार्टफोन JBL हेडफोनसह येतील. तथापि, कंपनीनेे ह्याची किंमत आणि उपलब्धता ह्याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.
अल्काटेल पॉप 4 च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 293ppi आहे. हा स्मार्टफोन 1.1GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डने 32GB पर्यंत वाढवू शकतो. ह्यात LED फ्लॅशसह 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन २५००mAh बॅटरीने सुसज्ज आहे.
अल्काटेल पॉप 4 प्लसविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.1GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1.5GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डने 32GB पर्यंत वाढवू शकतो. ह्यात 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात 2500mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
तसेच अल्काटेलचा तिसरा फोन पॉप 4S विषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे. ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल डेनसिटी 400ppi आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर मिडियाटेक हॅलियो P10 प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो. फोनमध्ये f/2.0 अॅपर्चर फेस डिटेक्शन ऑटो फोकस आणि LED फ्लॅशसह 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. तसेच ह्यात 2960mAh ची बॅटरी दिली गेली आहे. स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा आहे.
हेदेखील वाचा – सोनी एक्सपिरिया: एक्सपीरिया X सीरिजचे १ नाही, २ नाही तर तब्बल ३ स्मार्टफोन्स झाले लाँच
हेदेखील वाचा – MWC 2016 : अल्काटेल टू इन वन विंडोज टॅबलेट प्लस १० लाँच