मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी अल्काटेल वनटचने CES 2016 मध्ये आपला नवीन स्मार्टफोन फीयर्स XL लाँच केला. हा कंपनीचा पहिला विंडोज 10 मोबाईल आहे. हा स्मार्टफोन लवकरच अमेरिकेच्या बाजारात उपलब्ध होईल. सध्यातरी ह्याच्या किंमतीविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही, मात्र कंपनीचा असा दावा आहे की, फीयर्स XL स्मार्टफोन हा आपल्या बजेटमध्ये येणारा स्मार्टफोन असेल.
अल्काटेल वनटच फीयर्स XL स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले देण्यात आली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा 1.1GHz क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साय्याहाने 32GB पर्यंत वाढवता येते.
ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 2500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, हा १४ तासांचा टॉकटाइम आणि ८२० तासांचा स्टँडबाय टाइम देईल.
फीयर्स XL स्मार्टफोनवर मायक्रोसॉफ्ट ऑफिस मोबाईल प्रोडक्टिव्हिटी अॅप आधी इन्स्टॉल होतील. ह्यात वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, वननोट आणि वनड्राइव यांचा समावेश आहे. त्याशिवाय अल्काटेल वनटच फीयर्स एक्सएलमध्ये कोर्टाना आणि मायक्रोसॉफ्ट एजसारखे फीचर्स दिले गेले आहे.