फ्लॅश प्लस 2 स्मार्टफोन मागील वर्षी लाँच झालेल्या फ्लॅश प्लस स्मार्टफोनच्या नवीन जेन चा स्मार्टफोन आहे. ह्यात अॅनड्रॉईड मार्शमॅलो आहे.
अल्काटेलने आपला नवीन स्मार्टफोन फ्लॅश प्लस 2 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सर्वात पहिला फिलीपिन्स, मलेशिया, व्हिएतनाम, मोनाको आणि थायलँडमध्ये उपलब्ध होईल. अन्य देशांच्या लाँचविषयी अजून काही माहिती मिळालेली नाही.
फ्लॅश प्लस 2 स्मार्टफोन मागील वर्षी लाँच झालेल्या फ्लॅश प्लस स्मार्टफोनच्या नवीन जेन चा स्मार्टफोन आहे. ह्यात अॅनड्रॉईड मार्शमॅलो आहे. हा स्मार्टफोन ड्यूल सिमला सुद्धा सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये आपल्याला 5.5 इंचाची 1080p डिस्प्लेसह 1.8GHz मिडियाटेक हेलिओ P10 ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळत आहे. त्याचबरोबर कंपनीने मागील वर्षी भारतात आपला आणखी एक स्मार्टफोन अल्काटेल फ्लॅश 2 लाँच केला होता.
हा स्मार्टफोन दोन प्रकारांत मिळत आहे. ह्यातील 2GB/16GB ची किंमत १६० डॉलर म्हणजे जवळपास १०,७०० रुपये आणि 3GB/32GB ची किंमत १९० रुपये म्हणजे जवळपास १२,७०० रुपये आहे. स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 13MP चा रियर कॅमेरा ड्यूल-टोन रियल टोन फ्लॅशसह मिळत आहे. त्याशिवाय ह्यात आपल्याला 3000mAh क्षमतेची बॅटरी मिळत आहे आणि कंपनीचे म्हणणे आहे की, हा आपल्याला 3G नेटवर्कवर 15 तासांचा टॉकटाइम आणि 405 तासांचा स्टँडबाय टाइम देतो.