Alcatel 1 लोअर-एंड स्मार्टफोन एंड्राइड Oreo (Go Edition) सह इंटरनेट वर आला समोर, जाणून घ्या सर्व स्पेक्स आणि फीचर्स बद्दल…

Updated on 26-Jun-2018
HIGHLIGHTS

Alcatel 1 एंड्राइड Oreo (Go Edition) सह लॉन्च केला जाणार एक स्वस्त स्मार्टफोन असू शकतो.

Alcatel 1 could be the next Cheapest Smartphone with Android Oreo Go Edition: या वर्षीच्या सुरवातीला Alcatel ने MWC 2018 मध्ये काही नवीन स्मार्टफोंस सादर केले होते. या पोर्टफोलियो मध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणून कंपनी ने आपला Alcatel X1 लॉन्च केला होता. आता एका नवीन लीक वरून समोर येत आहे की कंपनी लवकरच एक स्वस्त डिवाइस लॉन्च करू शकते. 

Alcatel 1 हा डिवाइस असू शकतो जो कंपनी कडून खुप कमी किंमतीत लॉन्च केला जाईल. हा डिवाइस रशिया मध्ये दिसला आहे. हा एंड्राइड Oreo (Go Edition) सह लॉन्च केला जाणारा स्वस्त डिवाइस म्हणू शकतो. असे बोलले जात आहे की या डिवाइस ची किंमत 100 यूरो पेक्षा कमी असू शकते. कंपनी आपल्या लो-टियर स्मार्टफोंसना यूरोप आणि US च्या बाजारांमध्ये लॉन्च करण्यासाठी ओळखली जाते. त्याचप्रमाणे Alcatel 1 स्मार्टफोन सोबत पण कंपनी आपली ही परंपरा कायम ठेऊ शकते. 

हा डिवाइस एका 5-इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो, हा एका 960×480 पिक्सल चा टॉलर डिस्प्ले जो 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह येईल, सह लॉन्च केला जाऊ शकतो. या डिवाइस मध्ये तुम्हाला मीडियाटेक MT6739 प्रोसेसर मिळेल, यात एक क्वाड-कोर कोर्टेक्स A53 CPU देण्यात आला आहे, ज्याचा क्लॉक स्पीड 1.3GHz आहे, फोन मध्ये तुम्हाला 1GB रॅम व्यतिरिक्त 8GB इंटरनल स्टोरेज पण मिळेल, जी तुम्ही वाढवू शकता. कॅमेरा पाहता यात तुम्हाला एक 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळत आहे, याव्यतिरिक्त यात एक 2-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा मिळत आहे. 

नोट: फीचर्ड इमेज Alcatel 1X ची आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :