भारती Airtel देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये स्वस्त ते एक्सपेन्सिव्ह किंमत श्रेणीमध्ये अनेक प्लॅन्स ऑफर केले जातात. यामध्ये तुम्हाला आकर्षक वैधतेसह डेटा, अमर्यादित कॉलिंग, OTT इ. अनेक बेनिफिट्स मिळतात. मागील वर्षी कंपनीने 5G सेवा देखील लाँच केली आहे. त्यानुसार, पात्र ग्राहक आपल्या काही प्लॅन्ससह 5G सेवेचा देखील लाभ घेऊ शकतात.
दरम्यान, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅन्सची संपूर्ण माहिती देणार आहोत. हे प्लॅन्स तुम्हाला 500 रुपयांअंतर्गत मिळतील.
हा प्लॅन सर्वात बेसिक रिचार्ज आहे, जो 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज 100SMS, 2GB डेटा असे सामान्य बेनिफिट्स मिळतात. त्याबरोबरच, विंक म्युझिकचे मोफत सबस्क्रिप्शन आणि सर्व नेटवर्कवर HelloTunes वर मोफत ऍक्सेस देखील मिळेल.
एअरटेलच्या 265 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1GB डेटा मिळतो. डेटा, कॉलिंग आणि SMS सारखे फायदे वरील म्हणजेच 179 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसारखेच आहेत. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे.
Airtel च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल, दररोज 100SMS, एक्स्ट्रीम मोबाइल पॅक आणि विंक म्युझिकचा ऍक्सेस दिला जातो.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी एकूण 70GB डेटा मिळतो म्हणजेच तुम्हाला दररोज 2.5GB डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये मोफत व्हॉईस कॉल, 100SMS मिळतील. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये विंक म्युझिक आणि Airtel एक्सस्ट्रीम मोबाइल ऍपसारख्या स्ट्रीमिंग सेवांसाठी मोफत मेंबरशिप देखील उपलब्ध आहे. विशेष म्हणजेच युजरच्या मनोरंजनासाठी यात Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी उपलब्ध आहे.
या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 3GB डेटा उपलब्ध आहे. ज्यांना जास्त डेटाची आवश्यकता असते, त्यांच्यासाठी हा प्लॅन उत्तम आहे. प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल, दररोज 100SMS, एक्स्ट्रीम मोबाइल पॅक आणि विंक म्युझिकमध्ये ऍक्सेस दिला जातो. तर, OTT बेनिफिट्समध्ये तुम्हाला Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन देखील 3 महिन्यांसाठी मिळेल.