Airtel Plans: 28 दिवस वैधता आणि Unlimited बेनिफिट्ससह येणारे आकर्षक प्लॅन्स, किंमत 500 रुपयांहून कमी। Tech News 

Airtel Plans: 28 दिवस वैधता आणि Unlimited बेनिफिट्ससह येणारे आकर्षक प्लॅन्स, किंमत 500 रुपयांहून कमी। Tech News 
HIGHLIGHTS

28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या Airtel प्लॅन्सची संपूर्ण माहिती बघा

या प्लॅनमध्ये युजरना भरपूर डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि बरेच बेनिफिट्स मिळतील.

एवढेच नाही तर, यादीतील प्लॅनमध्ये OTT बेनिफिट्स देखील उपलब्ध

भारती Airtel देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये स्वस्त ते एक्सपेन्सिव्ह किंमत श्रेणीमध्ये अनेक प्लॅन्स ऑफर केले जातात. यामध्ये तुम्हाला आकर्षक वैधतेसह डेटा, अमर्यादित कॉलिंग, OTT इ. अनेक बेनिफिट्स मिळतात. मागील वर्षी कंपनीने 5G सेवा देखील लाँच केली आहे. त्यानुसार, पात्र ग्राहक आपल्या काही प्लॅन्ससह 5G सेवेचा देखील लाभ घेऊ शकतात.

दरम्यान, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लॅन्सची संपूर्ण माहिती देणार आहोत. हे प्लॅन्स तुम्हाला 500 रुपयांअंतर्गत मिळतील.

airtel 5g

Airtel चा 179 रुपयांचा प्लॅन

हा प्लॅन सर्वात बेसिक रिचार्ज आहे, जो 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज 100SMS, 2GB डेटा असे सामान्य बेनिफिट्स मिळतात. त्याबरोबरच, विंक म्युझिकचे मोफत सबस्क्रिप्शन आणि सर्व नेटवर्कवर HelloTunes वर मोफत ऍक्सेस देखील मिळेल.

Airtel चा 265 रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या 265 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1GB डेटा मिळतो. डेटा, कॉलिंग आणि SMS सारखे फायदे वरील म्हणजेच 179 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसारखेच आहेत. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध आहे.

Airtel चा 299 रुपयांचा प्लॅन

Airtel च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल, दररोज 100SMS, एक्स्ट्रीम मोबाइल पॅक आणि विंक म्युझिकचा ऍक्सेस दिला जातो.

Airtel Prepaid Plans

Airtel चा 399 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी एकूण 70GB डेटा मिळतो म्हणजेच तुम्हाला दररोज 2.5GB डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये मोफत व्हॉईस कॉल, 100SMS मिळतील. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये विंक म्युझिक आणि Airtel एक्सस्ट्रीम मोबाइल ऍपसारख्या स्ट्रीमिंग सेवांसाठी मोफत मेंबरशिप देखील उपलब्ध आहे. विशेष म्हणजेच युजरच्या मनोरंजनासाठी यात Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी उपलब्ध आहे.

Airtel चा 499 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 3GB डेटा उपलब्ध आहे. ज्यांना जास्त डेटाची आवश्यकता असते, त्यांच्यासाठी हा प्लॅन उत्तम आहे. प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल, दररोज 100SMS, एक्स्ट्रीम मोबाइल पॅक आणि विंक म्युझिकमध्ये ऍक्सेस दिला जातो. तर, OTT बेनिफिट्समध्ये तुम्हाला Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन देखील 3 महिन्यांसाठी मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo