Bharti Airtel आपल्या Rs 448 च्या प्रीपेड प्लान सोबत देत आहे 8.2GB जास्त डेटा

Updated on 07-Jan-2019
HIGHLIGHTS

जर Rs 448 मध्ये येणाऱ्या प्रीपेड प्लान बद्दल बोलायचे तर तुम्हाला या प्लान मध्ये तुम्हाला आता आधीपेक्षा जास्त डेटा मिळत आहे.

भारती एयरटेल आपल्या प्रीपेड प्लान्स मध्ये बदल करत आहे. तुम्हाला तर माहीतच आहे कि एयरटेल भारतीय बाजारात एक मोठे नाव आहे, आपण असे म्हणू शकतो कि हि भारतीय बाजारात टॉप वर राहिली आहे. कंपनी ने नुकतेच आपल्या पोर्टफोलियो मधून आपले जास्त रिचार्ज न होणारे प्लॅन्स काढून टाकले आहेत.

विशेष म्हणजे एयरटेल आपल्या Rs 199, Rs 448, आणि Rs 509 मध्ये येणाऱ्या प्रीपेड प्लान्स मध्ये 1.4GB डेली डेटा ऑफर करत आहे. कंपनीने आधीच आपल्या Rs 199 मध्ये येणार प्रीपेड प्लान रिवाइज केला आहे, आणि यात आता तुम्हाला 1.5GB डेली डेटा ऑफर केला जात आहे. या प्लानची वैधता 28 दिवस आहे.

आपल्या Rs 199 मध्ये येणाऱ्या प्रीपेड प्लान मध्ये काही बदल केल्यानंतर आता कंपनी ने त्यांचा Rs 169 चा प्लान ओपन मार्केट साठी उपलब्ध केला आहे. तसेच कंपनी ने आपले Rs 399 आणि Rs 448 वाले प्रीपेड प्लान्स पण बदललेले आहेत. जर Rs 448 मध्ये येणाऱ्या प्रीपेड प्लान बद्दल बोलायचे तर तुम्हाला सांगू इच्छितो कि या प्लान मध्ये तुम्हाला आता आधीपेक्षा जास्त डेटा मिळत आहे.

या प्लान मध्ये आतापर्यंत तुम्हाला 114.8GB डेटा मिळत होता, पण आता तुम्हाला या प्रीपेड प्लान मध्ये कंपनी कडून 123GB डेटा ऑफर केला जात आहे. याचा अर्थ असा आहे कि तुम्हाला आता या प्लान मध्ये जवळपास 8.2GB जास्त डेटा मिळत आहे. याचा अर्थ असा कि Rs 199 च्या प्रीपेड रिचार्ज प्लान प्रमाणे या प्लान मध्ये पण आता तुम्हाला 1.5GB डेली डेटा ऑफर केला जात आहे. पण Rs 399 मधील प्लान मध्ये आता तुम्हाला कमी डेटा दिला जात आहे.

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :