दीर्घकाळ म्हणजेच 84 दिवसांच्या वैधतेसह Airtel प्लॅन्सची यादी बघा
Airtel च्या 719 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा उपलब्ध आहे.
Disney+Hotstar चे मोबाइल सबस्क्रिप्शन रिचार्जमध्ये 3 महिन्यांसाठी दिले जाते.
भारती Airtel चे असे अनेक प्लॅन आहेत, ज्यात दररोज डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि अतिरिक्त फायदे दिले जातात. कंपनी निवडक प्रीपेड प्लॅनसह पूर्ण एक वर्षाची वैधता देखील ऑफर करते. मात्र, जर तुम्हाला खूप लांब आणि अगदी कमी वैधतेचे प्लॅन्स नको असतील, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. या रिपोर्टमध्ये आज आम्ही तुम्हाला 84 दिवसांच्या वैधतेसह Airtel प्लॅन्सबद्दल माहिती देणार आहोत. बघुयात यादी-
Airtel चा 455 रुपयांचा प्लॅन
जर तुम्ही डेटापेक्षा जास्त व्हॉइस कॉल वापरत असाल, तर हा Airtel प्रीपेड रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी आहे. 455 रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये 84 दिवसांसाठी फक्त 6GB डेटा मिळतो. परंतु, देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर कॉल तुमच्यासाठी मोफत राहतील. तसेच, वापरकर्ते कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दररोज 100SMS पाठवू शकतील. हा प्लॅन Hello Tunes आणि Wynk Music चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करते.
Airtel चा 719 रुपयांचा प्लॅन
Airtel च्या 719 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा उपलब्ध आहे. याशिवाय, प्लॅनमध्ये मोफत व्हॉईस कॉल, दररोज 100SMS आणि मोफत Xstream मोबाइल आणि RewardsMini सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. या प्लॅनची वैधता देखील 84 दिवसांची आहे.
Airtel चा 839 रुपयांचा प्लॅन
Airtel च्या या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा उपलब्ध आहे. याशिवाय, प्लॅनमध्ये मोफत व्हॉईस कॉल, दररोज 100SMS आणि मोफत Xstream मोबाइल आणि RewardsMini सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. हा प्लॅन देखील 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. तसेच, Disney+Hotstar चे मोबाइल सबस्क्रिप्शन रिचार्जमध्ये 3 महिन्यांसाठी दिले जाते.
Airtel चा 999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
Airtel रिचार्जमध्ये दररोज 2.5GB डेटा उपलब्ध आहे. याशिवाय, प्लॅनमध्ये मोफत व्हॉईस कॉल, दररोज 100 एसएमएस आणि मोफत Xstream मोबाइल आणि RewardsMini सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. तसेच, प्लॅन Amazon प्राइम सदस्यत्वाचा लाभ प्रदान करते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.