वोडाफोन आणि रिलायंस जियो मध्ये प्रीपेड सब्सक्राइबर्स साठी स्पर्धा चालू असताना एयरटेल ने एक नवीन प्रीपेड प्लान सादर केला आहे. Airtel च्या या नवीन प्लानची किंमत 168 रूपये आहे जो अनलिमिटेड कॉल्स, प्रतिदिन 1GB डाटा (4G स्पीडने) आणि प्रतिदिन 100 SMS ऑफर करत आहे. या प्लान मध्ये कॉलिंग साठी कोणतीही FUP लिमिट देण्यात आली नाही आणि या प्लानची वैधता 28 दिवस आहे.
तसेच, Telecom Talk च्या रिपोर्ट नुसार, कंपनी हेलो ट्यून्स चे फ्री सब्सक्रिप्शन पण देत आहे, जी कंपनीची कॉलर ट्यून सर्विस आहे.
लक्षता असू द्या कि Rs 168 चा हा प्लान एयरटेलच्या सर्व सर्कल्स मध्ये सादर करण्यात आला नाही. रिपोर्ट नुसार, हा प्लान दिल्ली, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सर्कल्स मध्येच उपलब्ध आहे. त्याचबरोबर काही सर्कल्स मध्ये हा प्लान सारख्याच बेनिफीट्स सह 20 दिवसांच्या वैधते साठी उपलब्ध आहे. तसेच अशाच प्रकारच्या बेनिफीट्स Rs 199 चा प्लान पण उपलब्ध आहे ज्याची वैधता 28 दिवस आहे आणि हा अनलिमिटेड कॉलिंग, प्रतिदिन 100 SMS आणि 1.4GB डेटा ऑफर करतो. एयरटेलचा हा प्लान संपूर्ण भारतात वैध आहे.
या प्लान्स सोबत असेल स्पर्धा
वोडाफोन ने पण Rs 159 चा प्लान याच बेनेफिट्स सह सादर केला आहे. जियो चा Rs 149 का प्लान अनलिमिटेड कॉलिंग, प्रतिदिन 100 SMS आणि 1.5GB हाई-स्पीड डेटा ऑफर करतो.
एयरटेलचा Rs 289 मधील प्लान
नुकताच एयरटेल ने एक Rs 289 मध्ये येणारा प्लान लॉन्च पण लॉन्च केला आहे. या प्लान मध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग लोकल आणि STD व्यतिरिक्त रोमिंग पण तुम्हाला या पॅक मध्ये मिळत आहे. तसेच या प्लान मध्ये तुम्हाला 1GB डेली डेटा सोबत 100 SMS प्रतिदिन मिळत आहेत. या सर्व सेवा तुम्हाला 48 दिवसांसाठी मिळत आहेत. हा प्लान सर्व एयरटेल यूजर्स साठी उपलब्ध आहे.