एअरटेल, आयडिया, वोडाफोनने लागू केले GSMA मोबाईल कनेक्ट सोल्युशन
मोबाईल पासवर्ड्सला कंटाळलेल्या लोकांसाठी ही सेवा खूपच फायद्याची ठरणार आहे.
GSMA चे मोबाईल कनेक्ट सोल्युशन भारतात सुरु झाले आहे. कंपनीने १९ जुलैला ह्याविषयी घोषणा केली. ही सेवा भारतात अनेक मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी एकत्र येऊन बनवली आहे. एअरटेल, वोडाफोन, आयडिया सेल्युलर, टाटा डोकोमो आणि टेलीनोर ने आपल्या मोबाईल नेटवर्क्सवर हा मोबाईल कनेक्ट सोल्युशन लागू केला आहे.
त्याचबरोबर मेक माय ट्रिपसारख्या सेवा प्रोवायडर्सने सुद्धा ह्या कनेक्ट सोल्युशन ला आपल्या अॅपवर लागू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Goibibo, ट्रुपे, जी डिजिटल आणि Zomatoसुद्धा ही सेवा लवकरच लागू करतील.
हेदेखील पाहा – Xolo One HD Review – झोलो वन HD रिव्ह्यू
त्याचबरोबर २२ देशांमध्ये ४२ ऑपरेटर्संनी ह्या मोबाईल कनेक्ट सोल्युशनला लागू केले आहे. भारत हा जगातील सर्वात मोठे दुसरे मोबाईल मार्केट आहे.
हेदेखील वाचा – अॅमेझॉन इंडियावर ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतायत हे गॅजेट्स
ह्या फीचरमुळे तुमचा फोन आता ऑनलाइन लॉग इन करुन काम करु शकतो. त्याचबरोबर यूजरच्या प्रायव्हसीसाठी पिनचा वापर करण्याची तरतूदही केली आहे.
हेदेखील वाचा – केवळ १ रुपयात मिळणार शाओमी Mi 5, रेडमी नोट 3, Mi मॅक्स स्मार्टफोन
हेदेखील वाचा – एअरटेलने आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी आणली “Happy Hours” ची भेट
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile