भारतातील प्रसिद्ध टेलिकॉम दिग्गज Airtel ने नुकतेच दोन नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. तर, एक नवीन रिचार्ज प्लॅन देखील सादर केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, नव्या प्लॅन्समध्ये Airtel युजर्सना कमी किमतीत अमर्यादित डेटासह अतिरिक्त फायदे दिले जातील. त्याबरोबरच, एक प्लॅन बदल करून सादर करण्यात आला आहे, जो 99 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन होय. या प्लॅनच्या किमतीत कपात करून हा प्लॅन नव्याने सादर केला गेला आहे.
होय, Airtel ने 39 आणि 49 रुपये असे दोन नवे प्लॅन लाँच केले आहेत. एवढेच नाही तर, Airtel च्या 99 रुपयांच्या प्लॅनची किंमत 20 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आता हा प्लॅन तुम्हाला केवळ 79 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
Airtel चा 39 रुपयांचा प्लॅन हा एक डेटा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा देण्यात आला आहे. हा प्लॅन संपूर्ण एका दिवसाच्या वैधतेसह येतो. तुम्हाला हा फोन सकाळी रिचार्ज करावा लागेल. लक्षात घ्या की, या प्लॅनमध्ये 20GB चे FUP (फेयर युसेज पॉलिसी) दिली जाईल. यानंतर तुम्हाला 64kps स्पीडसह इंटरनेट वापरता येईल. तुम्हाला या रिचार्ज प्लॅनसोबत वेगळ्या बेस प्लॅनची आवश्यकता असणार आहे.
Airtel च्या 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल करण्यात आले आहेत. हा प्लॅन देखील संपूर्ण एका दिवसाच्या वैधतेसह येणार आहे. हा प्लॅन देखील अमर्यादित डेटा प्लॅनसह येतो. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये संपूर्ण एका महिन्यासाठी म्हणजेच 30 दिवसांसाठी प्लस विंक प्रीमियम सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये 20GB चे FUP (फेयर युसेज पॉलिसी) दिली जाईल. यानंतर तुम्हाला 64kps स्पीडसह इंटरनेट वापरता येईल. यासह तुम्हाला वेगळ्या बेस प्लॅनची आवश्यकता देखील आहे.
एअरटेल या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटा फायदे देखील देते. या प्लानमध्ये यूजर्सना दोन दिवसांची वैधता मिळते. म्हणजेच वैधतेदरम्यान तुम्ही संपूर्ण दोन दिवस अमर्यादित डेटाचा लाभ घेऊ शकता. या प्लॅनमध्ये 20GB चे FUP (फेयर युसेज पॉलिसी) दिली जाईल. यानंतर तुम्हाला 64kps स्पीडसह इंटरनेट वापरता येईल. जर तुमची नियमित दैनिक डेटा मर्यादा तुम्हाला पुरेशी नसेल, तर तुम्ही Airtel चा हा प्लॅन खरेदी करू शकता.