OPPO F11 Pro मधील AI कॅमेऱ्याने लो लाइट मध्ये पण घेऊ शकता चांगले पोर्ट्रेट फोटोज

Updated on 09-Mar-2019
HIGHLIGHTS

OPPO F11 Pro मध्ये तुम्हाला कॅमेरा सेटिंग्स मॅनुअली सेट करण्याची गरज नाही कारण या नवीन फोन मधील AI तुमची मदत करतो.

एखादा स्मार्टफोन विकत घेण्यापूर्वी आजकल लोक सर्वात आधी स्मार्टफोनचा कॅमेरा बघतात. जरी हाई मेगापिक्सल फोटोची क्वालिटी चांगली करत असले तरी इथेच हे थांबत नाही. अनेक DSLR फक्त 24MP चे सेंसर्स ऑफर करतात पण तरीही शानदार फोटो घेतात. असे होण्या मागचे कारण म्हणजे DSLR यूजर्सना वेगवेगळ्या कॅमेरा सेटिंग्स वर योग्य कंट्रोल पण मिळतो. त्यामुळे ज्या यूजर्सना कॅमेरा सेटिंग्सची माहिती असते आणि ज्यांना माहित असते कि ते काय करत आहेत अशी यूजर्स DSLR चा वापर करून चांगले शॉट्स घेऊ शकतात. पण अनेक यूजर्स स्मार्टफोनच्या डिफॉल्ट कॅमेरा मोड मधूनच फोटो घेतात. त्यामुळे ते एम्बिएंट लाइटिंग कंडीशंस मध्ये बेस्ट फोटो कॅप्चर करू शकत नाहीत. तर काही फोन्स ‘प्रो’ मोड ऑफर करतात जे सामान्य यूजर साठी थोडा भयावह असू शकतो.

या समस्येचे उत्तर डिफॉल्ट कॅमेरा स्मार्ट बनवणे असा होता जेणेकरून तो आपोआप कॅमेरा सेटिंग बदलू शकेल. ग्लोबल निर्माता OPPO ने पण अशाप्रकारच्या बदलासाठी AI च्या ताकदीचा वापर केला आहे. आता कंपनी आपल्या नवीन स्मार्टफोन OPPO F11 Pro सह हा बदल अजून चांगला करण्याचा प्रयत्न करत आहे. हा फोन अनेक दमदार कॅमेरा स्पेक्स ऑफर करतो ज्याला AI अजून बूस्ट करतो.

कॅमेरा चे स्पेक्स

OPPO F11 Pro मध्ये वापरण्यात आलेल्या AI टेक बद्दल बोलण्याआधी आधी एक नजर याच्या हार्डवेयर वर टाकूया. OPPO F11 Pro च्या मागील बाजूस 48MP + 5MP चा डुअल-रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या कॅमेऱ्याचा अपर्चर F1.79 आहे जो सेंसरला जास्त प्रकाश पोचवतो. डिवाइसच्या फ्रंटला एक 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे जो फोनच्या वरच्या बाजूने वर येतो, याचा अर्थ असा कि तुम्हाला डिस्प्ले वर कोणतीही नोच सहन करावी लागत नाही.

आता अंधाराला घाबरण्याची गरज नाही

OPPO F11 Pro अंधारात ब्राइट फोटो घेण्यासाठी 48MP च्या रियर सेंसर मधील अल्ट्रा नाईट मोड सह मिळून काम करतो. OPPO ने सांगितले कि, स्मार्टफोन मध्ये वापरण्यात आलेली 4-इन-1 टेक्नोलॉजी चार पिक्सल्स एकत्र कंबाइन करते, ज्यामुळे फोटो सेंसिटिव एरियाची साइज वाढते. तसेच, डिवाइस मध्ये 1/2.25 इंचाचा सेंसर आहे जो कमी प्रकाशात फोटोची क्वालिटी चांगली ठेवतो.

ब्राइटनेस अजून वाढवतो हा फोन

जर एखाद्या स्थितीत एम्बिएंट लाइट खूप कमी असेल तर OPPO चा AI अल्ट्रा-क्लियर इंजिन आपले काम सुरु करतो. कंपनी म्हणते कि हे फीचर चांगल्या फोटो साठी AI इंजिन, अल्ट्रा नाईट मोड आणि डेजल कलर मोडचा वापर करतो. Ultra Night Mode इमेज स्टेबलाइजेशन साठी ऑप्टीमाइजेशन करतो, जे लॉन्ग-एक्सपोजर शॉट्स साठी खूप गरजेचे फीचर आहे. तसेच, OPPO असे पण म्हणते कि फोट मधील पोर्ट्रेट आणि बॅकग्राउंड सीन वेगवेगळे प्रोसेस होतात, ज्यामुळे फोटो मध्ये अधिक नैसर्गिक स्किन टोन दिसेल.

फोन मध्ये आहे रेजल-डेजल मोड

जास्तीत लोकांना आपल्या स्मार्टफोन्स मधून वाइब्रेंट आणि कलरफुल फोटजची अपेक्षा असते. असे प्रोडक्शन नंतर करता येते पण असे केल्याने स्किन टोन कृत्रिम वाटते. OPPO F11 Pro चा डेजल कलर मोड फोनच्या AI इंजिनचा वापर करून अनेक समस्या सोडवतो. कंपनी म्हणते की फोन मध्ये स्किन कंट्रोल मॉड्यूल देण्यात आला आहे जो बॅकग्राउंड पासून सब्जेक्टचा स्किन कलर वेगळा मॅप करतो. यामुळे फोट वाइबरेंट सोबतच अधिक नैसर्गिक वाटतात.

हा अनेक सीन रिकोग्नाइज करू शकतो

AI सीन रिकोग्नाइज बद्दल बोलायचे तर हा काही नवीन फीचर नाही, पण OPPO F11 Pro थोडे जास्त सीन रेकोग्नाइज करू शकतो. यात नाइट सीन, सनराइज/सनसेट, स्नो सीन, फूड, ब्लू स्काइ, इंडोर, ग्रीन ग्रास, लँडस्केप, बीच, फायरवर्क्स, डॉग, स्पॉटलाइट, पोर्टरेट, मल्टी-पर्सन पोर्टरेट आणि इतर अनेक सीन्सचा समावेश आहे.

एक्सपीरियन्स

यूजर एक्सपिरियन्स बद्दल बोलायचे तर OPPO F11 Pro VOOC 3.0 टेकनोलॉजी सह येतो जी चार्जिंग टाइम 20 मिनिटांपर्यंत कमी करते आणि चार्जिंग स्पीड मध्ये सुधार आणते. F11 सीरीज फोन्स 4,000mAh बॅटरी सह आले आहेत जे मागील जनरेशनच्या फोन्सच्या तुलनेत 14% अधिक बॅटरी क्षमता ऑफर करतात. अशाप्रकारे यूजर दीर्घकाळ वापरता येणाऱ्या बॅटरी लाइफचा वापर करू शकतील. OPPO च्या इंटरनल टेस्ट मध्ये, एकदा फुल चार्ज केल्यावर बॅटरी 15.5 तास चालते आणि यावर 12 तास सलग विडियो किंवा 5.5 तास हेवी गेम प्ले केला जाऊ शकतो. अजून एक खास फीचर या फोन मध्ये आहे तो म्हणजे परफॉर्मेंस एक्सेलेरेशान इंजिन आणि याला हाइपर बूस्ट नाव देण्यात आले आहे. हे इंजिन सिस्टमच्या स्तरावर एक चांगला अनुभव देण्यासाठी सिस्टम, गेमिंग आणि ऍप परफॉर्मेंस सुधारण्यासाठी त्री स्तरीय टेक्नॉलॉजीचा वापर करतो.

आपल्या AI कॅपबिलिटी आणि इतर अनेक खास फीचर्स मुळे OPPO F11 Pro कोणालाही शानदार फोटो घेण्यास मदत करू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला फोटो घेणे आवडत असेल आणि असा फोन शोधत असाल जो लो लाइट कंडीशन मध्ये चांगले फोटो घेत असेल तर OPPO F11 Pro तुम्हाला आवडेल.

[स्पोन्सर्ड पोस्ट]

Sponsored

This is a sponsored post, written by Digit's custom content team.

Connect On :