नवीन अपडेट नंतर Huawei P20 Pro मध्ये रेकॉर्ड करता येईल 960fps वर स्लो-मोशन विडियो

Updated on 26-Jun-2018
HIGHLIGHTS

Huawei P20 Pro स्मार्टफोनला मिळणार्‍या या अपडेट मध्ये एक लिमिटेशन असेल की हा सुपर स्लो-मोशन मध्ये फक्त 0.1 सेकंड साठी विडियो रेकॉर्ड करू शकेल.

After new update Huawei P20 Pro will be able to shoot slow-mo at 960fps: Huawei P20 Pro सध्या सर्वात बेस्ट कॅमेरा फोन आहे. हा बाजारात एक मात्र असा कॅमेरा आहे जो ट्रिपल सेंसर सह तुम्हाला 40-मेगापिक्सल रेजोल्यूशन सह मिळत आहे आणि प्रत्येक कंडीशन मध्ये चांगले फोटो घेतो. पण याची पडती बाजू याचा विडियो रेकॉर्डिंग फीचर आहे.  XDA नुसार, Huawei च्या फ्लॅगशिप डिवाइस मध्ये विडियो रेकॉर्डिंग क्षमते मध्ये सॉफ्टवेयर अपडेट च्या माध्यामातून सुधार केला जाईल. 

आगामी फर्मवेयर सुपर स्लो-मोशन विडियो रेकॉर्डिंग घेऊन येईल ज्यामुळे डिवाइस 960fps वर विडियो रेकॉर्ड करू शकतो. लक्षात असू दे की हा फीचर नवीन नाही, तर आधीपासून काही लेटेस्ट फ्लॅगशिप डिवाइस मध्ये हा दिसला आहे, ज्यात Samsung Galaxy S9 लाइन-अप आणि काही Sony Xperia च्या डिवाइस चा समावेश आहे. अपडेट बद्दल लीक झालेल्या माहिती वरून समजले आहे की सुपर-स्लो-मोशन मोड 720p रेजोल्यूशन सह येईल. जर Sony Xperia च्या फ्लॅगशिप स्मार्टफोंस बद्दल बोलायचे झाले तर काही फोंस फुल HD मध्ये 960fps वर विडियो रेकॉर्ड केला जाऊ शकतो. 

यात अजून एक लिमिटेशन असेल की हा सुपर स्लो-मोशन मध्ये फक्त 0.1 सेकंड साठी विडियो रेकॉर्ड करू शकेल, याचा अर्थ असा की विडियो स्लो डाउन झाल्यावर 5 ते 6 सेकंड्स पर्यंतच्या विडियो चा हा स्लो-मोशन विडियो रेकॉर्ड करू शकेल. Huawei P20 Pro च्या या अपडेट मध्ये नवीन झूम इंटरफेस पण देण्यात आला आहे, ज्यामुळे एक सिंपल स्वाइप ने झूम करता येईल. हा अपडेट कधी जारी केला जाईल याची माहिती अजून समोर आली नाही. 

Huawei P20 Pro मध्ये कंपनी चा लेटेस्ट किरिन 970 SoC आहे जो डेडिकेटेड न्यूरल प्रोसेसिंग यूनिट (NPU) सह येतो आणि हा डिवाइस एंड्राइड ओरियो वर आधारित EMUI 8.1 वर चालतो. या स्मार्टफोन मध्ये 6.1 फुल HD+ OLED फुल व्यू डिस्प्ले आहे आणि डिवाइस च्या फ्रंट वर होम बटन आहे. हा होम बटन एजलेस फिंगरप्रिंट ला सपोर्ट करतो ज्यामुळे हा जेस्चर पण ओळखू शकतो जसे होम साठी लॉन्ग टॅप, बॅक साठी शॉर्ट टॅप आणि मल्टी टास्किंग साठी डावी आणि उजवी स्वाइप. 

Huawei P20 Pro मधील ट्रिपल कॅमेरा मध्ये 40 MP RGB 1/1.7-इंच सेंसर, 20 MP मोनोक्रोम सेंसर आणि 8MP टेलीफोटो लेंस आहे. डिवाइस च्या फ्रंट ला 24.8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे जो 3D पोर्ट्रेट लाइट इफेक्ट ला सपोर्ट करतो. हा डिवाइस 360 फेस अनलॉक फीचर सह येतो जो सेकंड्स मध्ये डिवाइस अनलॉक करू शकतो. तसेच डिवाइस मध्ये 4000mAh ची बॅटरी आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :