प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo चा आगामी स्मार्टफोन बुधवारी भारतीय बाजारात लाँच होणार आहे. होय, उद्या म्हणजेच 17 एप्रिल 2024 रोजी कंपनी आपला नवा Vivo T3x 5G स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. आगामी फोनबद्दल लीक्स बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर सुरु आह. त्याबरोबरच, कंपनीने या फोनबद्दल प्रोसेसर, किंमत इत्यादीसह काही महत्तवाचे तपशील आधीच उघड केले आहेत. बघुयात सर्व तपशील-
हे सुद्धा वाचा: नवा Affordable स्मार्टफोन Moto G64 5G भारतात लाँच, 12GB रॅमसह जबरदस्त फीचर्स उपलब्ध। Tech News
Vivo ने खुलासा केला आहे की, Vivo T3x 5G स्मार्टफोन 6000mAh बॅटरीसह येईल, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Vivo T3x 5G हा 6000mAh बॅटरीसह येणारा या सेगमेंटमधील सर्वात पातळ स्मार्टफोन असेल, असे कंपनीने सांगितले आहे. हा स्मार्टफोन सेलेस्टियल ग्रीन आणि क्रिमसन ब्लिस या दोन कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला जाईल.
एवढेच नाही तर, हा हँडसेट Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज असेल. त्याबरोबरच, हा आगामी हँडसेट ड्युअल-रिअर कॅमेरा सेटअपसह येईल, जो सर्क्युलर कॅमेरा मॉड्यूलमध्ये ठेवला जाईल. या फोनची किंमत 15000 रुपयांच्या आत ठेवली जाईल, असे देखील सांगण्यात आले आहे. फोनची खरी किंमत फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येईल.
Vivo चा आगामी Vivo T3x 5G डिव्हाइस फुल HD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.72-इंच लांबीच्या LCD स्क्रीनने सुसज्ज असेल. याशिवाय, हा स्मार्टफोन ऑडिओ बूस्टर सपोर्टसह ड्युअल स्टीरिओ स्पीकरसह येण्याची शक्यता आहे. ताज्या अहवालानुसार, फोटोग्राफीसाठी आगामी T3x 5G मध्ये मागील बाजूस 50MP + 2MP कॅमेरा सेटअप असण्याची अपेक्षा आहे. तर, फोनमध्ये 8MP सेल्फी शूटर असण्याची शक्यता आहे. याशिवाय, इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन ऑडिओ बूस्टर सपोर्टसह ड्युअल स्टीरिओ स्पीकरसह येण्याची शक्यता आहे.