केवळ २ तासांत विकले गेले 1 लाख Le 2, Le 2 pro आणि Le Max 2 स्मार्टफोन्स

केवळ २ तासांत विकले गेले 1 लाख Le 2, Le 2 pro आणि Le Max 2 स्मार्टफोन्स
HIGHLIGHTS

Le 2, Le 2 pro आणि Le Max 2 स्मार्टफोन्सची पहिली फ्लॅश सेल मंगळवारी झाली. ह्या सेलमध्ये केवळ दोन तासांत हे स्मार्टफोन्स सोल्ड आऊट झाले. असे सांगितले जातय की, एवढ्या कमी वेळात १ मिलियन स्मार्टफोन्स विकले जाणे हा एक आतापर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे.

Le 2, Le 2 Pro आणि Le Max 2  स्मार्टफोन्सच्या लाँचवेळी सांगितले गेले होते की, ह्या तिन्ही स्मार्टफोन्सचे १ लाख यूनिट्स पहिल्या फ्लॅशसेलमध्ये विकले जातील. त्याप्रमाणे ह्या स्मार्टफोन्सची पहिला फ्लॅशसेल मंगळवारी झाला होता. ज्यात समोर आलेल्या अहवालानुसार, केवळ २ तासांत हे सर्व स्मार्टफोन्स विकले गेले. एवढ्या कमी वेळात १ मिलियन स्मार्टफोन्स विकले जाणे हा एक आतापर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे.
 

ह्या स्मार्टफोनच्या स्पेक्सविषयी बोलायचे झाले तर, LeEco le 2 आणि Le 2 प्रो मध्ये 5.5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. तर Le मॅक्स 2 स्मार्टफोनमध्ये 5.7 इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे.

जर ह्याच्या प्रोसेसरविषयी बोलायचे झाले तर, LeEco Le 2 ला 2.3GHz डेका-कोर मिडियाटेक हेलियो X20 प्रोसेसरसह लाँच केला गेला आहे. तर Le 2 प्रोमध्ये डेका-कोर मिडियाटेक हेलियो X25 प्रोसेसर दिला गेला आहे. जर Le मॅक्स 2 च्या प्रोसेसरविषयी बोलायचे झाले तर, ह्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर दिला गेला आहे. ह्या फोन्सच्या रॅमविषयी बोलायचे झाले तर, LeEco le 2 मध्ये 3GB रॅंम, Le 2 प्रो मध्ये 4GB रॅम आणि Le max 2 मध्ये 6GB ची रॅम देण्यात आली आहे.

हेदेखील पाहा – ६००० च्या किंमतीत येणारे उत्कृष्ट स्मार्टफोन्स

LeEco le 2 स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा ड्यूल टोन LED फ्लॅशसह सुसज्ज आहे. तर Le 2 प्रो आणि Le मॅक्स 2 स्मार्टफोनमध्ये 21 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ह्या तिनही स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. रियर पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे. तिन्ही स्मार्टफोनमध्ये USB टाइप-C पोर्ट दिला आहे.

 हेदेखील वाचा – मोटो G टर्बो विराट फॅनबॉक्स सह भारतात झाला लाँच
 हेदेखील वाचा – HTC वन S9 स्मार्टफोन लाँच, 2GB रॅमने सुसज्ज

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo