Google कडून Pixel फोनसाठी 5G अपडेट जारी, आता ‘या’ फोन्समध्ये वापरता येईल…

Google कडून Pixel फोनसाठी 5G अपडेट जारी, आता ‘या’ फोन्समध्ये वापरता येईल…
HIGHLIGHTS

Google Pixel फोनसाठी 5G अपडेट जारी

जवळपास 6 वर्षांनंतर गुगलने गेल्या वर्षी भारतात पिक्सेल सीरीज सादर केली आहे.

Pixel 6 आणि Pixel 7 सिरीज वापरकर्ते Jio आणि Airtel दोन्ही नेटवर्कवर 5G वापरू शकतात.

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर Google ने आपल्या Pixel फोनसाठी 5G अपडेट जारी केले आहे. ज्या वापरकर्त्यांनी Android 13 चा QPR2 Beta 2 अपडेट केला आहे. Google Pixel 6 आणि Google Pixel 7 सीरिजमधील फोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटी मिळू लागली आहे.

हे सुद्धा वाचा : Netflix, Amazon Prime, Disney+ Hotstar, असो वा Sony Liv किंवा ZEE5, सर्व 'या' रिचार्जमध्ये मोफत

 जवळपास 6 वर्षांनंतर गुगलने गेल्या वर्षी भारतात पिक्सेल सीरीज सादर केली आहे. Google च्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज Google Pixel 7 अंतर्गत Pixel 7 आणि Pixel 7 Pro भारतात सादर करण्यात आले आहेत. Pixel 7 ची सुरुवातीची किंमत 59,999 रुपये आहे. तर, Pixel 7 Pro ची सुरुवातीची किंमत 84,999 रुपये आहे. हे दोन्ही फोन 6 ऑक्टोबर 2022 रोजी भारतात लॉन्च करण्यात आले आहेत.'

Pixel 6 आणि Pixel 7 सिरीज वापरकर्ते Jio आणि Airtel दोन्ही नेटवर्कवर 5G वापरू शकतात. भारताबद्दल बोलायचे झाले तर, Google Pixel 6a, Pixel 7 आणि Pixel 7 Pro मध्ये 5G सपोर्ट आहे. Pixel 7, Pixel 7 Pro आणि Pixel 6 चे वापरकर्त्यांना आता 5G वापरता येईल.

जोपर्यंत बँड्सचा संबंध आहे, Google Pixel 6a ला 19 5G बँडसाठी समर्थन आहे. तर, Pixel 7 आणि Pixel 7 Pro सह 22 5G बँड देण्यात आले आहेत. तुमच्याकडे यापैकी कोणताही Pixel फोन असल्यास, तुम्ही बीटा अपडेट डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला 5G कनेक्टिव्हिटी मिळण्यास सुरुवात होईल, जरी अंतिम अपडेट रिलीज होण्यास वेळ लागेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo