Google ने केली मोठी घोषणा, Google Pixel स्मार्टफोनमध्ये लवकरच मिळेल 5G सपोर्ट

Google ने केली मोठी घोषणा, Google Pixel स्मार्टफोनमध्ये लवकरच मिळेल 5G सपोर्ट
HIGHLIGHTS

Google ने अद्याप 5G अपडेट त्यांच्या उपकरणांवर आणलेले नाही.

Google Pixel स्मार्टफोनमध्ये 5G अपडेटसाठी टाइमलाईन जारी

हे अपडेट 2023 च्या पहिल्या तिमाहीत आणले जाईल.

1 ऑक्टोबर 2022 रोजी भारतात 5G सेवा सुरू करण्यात आली. अँड्रॉइड स्मार्टफोन्सपासून ते iPhones उपकरणांपर्यंत सर्व आता Airtel 5G आणि Jio 5G वर काम करतात. मात्र गुगल स्मार्टफोन कंपनी या बाबतीत मागे पडली आहे. Google ने अद्याप 5G अपडेट त्यांच्या उपकरणांवर आणलेले नाही. जर तुम्ही Google Pixel वापरकर्ता असाल आणि तुम्ही तुमच्या डिव्हाइसमध्ये 5G ची वाट पाहत असाल, तर तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कंपनीने अखेर त्यांच्या उपकरणांसाठी 5G रोलआउट टाइमलाइन जारी केली आहे.

हे सुद्धा वाचा : Jio True 5G: Jio चे 5G नेटवर्क अजून येत नाही, 'या' सोप्या टिप्स फॉलो करा 

Google ने माहिती दिली आहे की, ते लवकरच ओव्हर-द-एअर (OTA) अपडेट्सद्वारे आपल्या स्मार्टफोन उपकरणांवर 5G सेवा आणणार आहे. हे अपडेट 2023 च्या पहिल्या तिमाहीत आणले जाईल. कंपनीने अद्याप निश्चित तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, भारतात फक्त 3 Google Pixel स्मार्टफोनला 5G सपोर्ट मिळेल. म्हणजेच Google Pixel 7, Google Pixel 7 Pro आणि Google Pixel 6a या स्मार्टफोन्सवर मिळणार आहे.

 यापूर्वी असे मानले जात होते की, Google, Samsung आणि Apple सोबत या वर्षी डिसेंबरपर्यंत 5G अपडेट आणणार आहे. मात्र, तसे झाले नाही. सॅमसंग आणि ऍपलने आधीच हे अपडेट त्यांच्या उपकरणांवर आणले आहे, तर गुगल या बाबतीत दोन्ही कंपन्यांपेक्षा खूप मागे आहे. आता Google Pixel वापरकर्त्यांना 5G अपडेटसाठी मार्च 2023 पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo