10 हजार रुपयांच्या आत 5 सर्वोत्तम स्मार्टफोन, 5000mAh बॅटरी देखील उपलब्ध, बघा यादी

10 हजार रुपयांच्या आत 5 सर्वोत्तम स्मार्टफोन, 5000mAh बॅटरी देखील उपलब्ध, बघा यादी
HIGHLIGHTS

10 हजार रुपयांच्या आत 5 सर्वोत्तम स्मार्टफोनची यादी

Poco, Infinix इ. ब्रँड्स यादीमध्ये उपलब्ध

बघा 5 सर्वोत्तम एंट्री लेव्हल फोन

एंट्री लेव्हल स्मार्टफोन्सचे युग संपलेले नाही आणि कधीच संपणार नाही. जेव्हा कोणी पहिल्यांदा स्मार्टफोन विकत घेतो, तेव्हा तो सहसा एंट्री लेव्हल फोन खरेदी करतो. सध्याच्या बाजारात एंट्री लेव्हल फोन म्हणजे फोनची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत येणारे फोन्स होत. आज चांगले कॅमेरे, मोठी बॅटरी आणि डेली युज परफॉर्मन्स  असलेले स्मार्टफोन 10 हजार रुपयांपर्यंतच्या किमतीत बाजारात सहज उपलब्ध होतील. जर तुम्ही एंट्री लेव्हल फोन शोधत असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. या लेखात आम्ही तुम्हाला 10,000 रुपयांच्या रेंजमधील काही सर्वोत्तम स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत.

हे सुद्धा वाचा : iPhone 14: नव्या सिरीजमध्ये मोठा आणि दमदार कॅमेरा उपलब्ध आहे, जाणून घ्या लाँच डेट

Poco C3 – 8,499 रुपये 

तुम्हाला 8,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत Poco C3 मिळेल. या किंमतीत, तुम्हाला 3 GB RAM सह 32 GB स्टोरेज मिळेल. पोकोचा हा फोनही सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन आहे. त्याचे 4 GB रॅम असलेले 64 GB स्टोरेज मॉडेल 9,499 रुपयांना उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.53-इंच HD+ डिस्प्ले व्यतिरिक्त, MediaTek Helio G35 प्रोसेसर आणि तीन रियर कॅमेरे उपलब्ध असतील. ज्यामध्ये मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सेल आहे. सेल्फीसाठी, या फोनमध्ये 5 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक, 4G LTE, Wi-Fi आणि मायक्रो USB पोर्ट सारखे फीचर्स आहेत. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक देखील आहे. येथून खरेदी करा… 

Lava Blaze – 8,999 रुपये 

या फोनची विक्री 14 जुलैपासून सुरू होणार आहे. लावाच्या या फोनमध्ये 6.5-इंच लांबीचा HD + डिस्प्ले आहे. याशिवाय, यात MediaTek Helio Helio A22 प्रोसेसर आहे. फोनमध्ये Android 12 आहे. LAVA Blaze सह, 3 GB RAM सह 64 GB स्टोरेज उपलब्ध असेल, जे मेमरी कार्डच्या मदतीने 256 GB पर्यंत वाढवता येते. LAVA Blaze मध्ये तीन मागील कॅमेरे आहेत, ज्यात प्रायमरी लेन्स 13 मेगापिक्सेल आहे. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.  

Redmi 9 Active – 9,399 रुपये 

4 GB रॅम सह Redmi 9 Active चे 64 GB स्टोरेज व्हेरिएंट Flipkart वरून 9,399 रुपयांना खरेदी करता येईल. Redmi 9 Active मध्ये 6.53-इंच लांबीचा HD+ IPS डिस्प्ले आहे. फोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर देखील उपलब्ध असेल. या Redmi फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सेल आणि दुसरा 2 मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळेल. येथून खरेदी करा… 

Moto E32s – 9,449 रुपये 

Moto E32s च्या 3 GB RAM सह 32 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,449 रुपये आहे. फोन 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज वेरिएंटसह देखील येतो, ज्याची किंमत 9,999 रुपये आहे. Moto E32s MediaTek Helio G37 प्रोसेसरसह Android 12 वर चालतो. Moto E32s मध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.5-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. Moto E32s मध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्यात प्राइमरी लेन्स 16 मेगापिक्सेल आहे. सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. तसेच, यामध्ये 5000mAh बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, GPS/ A-GPS, USB Type-C पोर्ट आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

Infinix Smart 6- 7,499 रुपये 

Infinix Smart 6 मध्ये 6.6-इंच लांबीचा HD Plus डिस्प्ले आहे. फोनमध्ये MediaTek Helio A22 प्रोसेसरसह Android 11 (Go Edition) आधारित XOS 7.6 आहे. फोनसोबत 4 GB रॅम आणि 32 GB स्टोरेज उपलब्ध असेल. 4GB RAM मध्ये 2GB व्हर्च्युअल रॅम देखील समाविष्ट आहे. फोनमध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध असेल. Infinix Smart 6 मध्ये ड्युअल AI रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 8 मेगापिक्सेल आहे. त्याच्यासोबत डबल LED फ्लॅश आहे. यात 5 मेगापिक्सेलचा AI सेल्फी कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरासह फ्लॅश लाइट देखील आहे. Infinix Smart 6 DTS-HD सराउंड साउंडला सपोर्ट करतो. यात ब्लूटूथ v5.0 आहे. फोनसोबत 5000mAh बॅटरी आहे, जी 31 तासांचा बॅकअप असल्याचा दावा करते. येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo