15 हजार रुपयांच्या बजेटमधील 5 सर्वोत्कृष्ट फोनची यादी, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स

15 हजार रुपयांच्या बजेटमधील 5 सर्वोत्कृष्ट फोनची यादी, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स
HIGHLIGHTS

15 हजार रुपयांच्या बजेटमधील 5 सर्वोत्कृष्ट फोन

बजेटमध्ये मिळतील जबरदस्त फीचर्स

नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर पुढील यादी बघा

भारतीय स्मार्टफोन बाजारात 15 हजार रुपयांचा सेगमेंट सर्वाधिक लोकप्रिय आहे. Xiaomi ते Oppo, Vivo आणि Realme सारख्या कंपन्या या किंमतीच्या रेंजमध्ये त्यांचे फोन विकतात. दरम्यान, बहुतेक ग्राहक या श्रेणीतील नवीन फोन शोधत आहेत. तुम्हीही मिड रेंज स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचा शोध इथेच संपतो. आम्‍ही तुम्‍हाला 15 हजार रुपयांखालील 5 सर्वोत्‍तम फोनबद्दल सांगणार आहोत.

1. Vivo T1

Vivo T1 च्या 4GB रॅम आणि 128GB वेरिएंटची किंमत 14,499 रुपये आहे. फोनमध्ये 44W फ्लॅश चार्जची सुविधा आहे, हा फोन कंपनीनुसार 28 मिनिटांत फोन 50 टक्के चार्ज होईल. यात 6.44-इंच लांबीचा FHD + AMOLED डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आहे. हा फोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येते, ज्यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 2MP बोकेह कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. 

2. Oppo K10

Oppo K10 स्मार्टफोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 14,990 रुपयांना उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.59-इंचाचा डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP मेन कॅमेरा, 2MP बोकेह कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. फोनला 5000mAh बॅटरी सपोर्ट आहे, जो 33W सुपर-व्होल्टेज चार्जिंगला सपोर्ट करतो.

हे सुद्धा वाचा : 50MP कॅमेरा आणि आकर्षक डिझाइनसह नवीन Realme स्मार्टफोन, मिळेल पूर्ण 5000 रुपयांची सूट

3. Redmi 10

Redmi 10 चा 6GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट 12,499 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.7-इंच  लांबीचा IPS LCD डिस्प्ले आणि Snapdragon 680 प्रोसेसर आहे. विशेष म्हणजे फोनमध्ये 6000mAh बॅटरी आहे आणि 10W इन-बॉक्स चार्जरसह येतो. फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करतो, ज्यामध्ये 50MP मेन कॅमेरा, 2MP पोर्ट्रेट कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 5MP फ्रंट कॅमेरा आहे.

4. Poco M4 Pro 5G

Poco M4 Pro 5G स्मार्टफोनच्या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 14,999 रुपये आहे. यात 6.6-इंचा लांबीचा फुल HD + डिस्प्ले आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 810 प्रोसेसर आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि 8 मेगापिक्सेलचा दुसरा सेन्सर आहे. त्याची बॅटरी 5000mAh आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

5. Realme 9i

Realme 9i चा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट 13,499 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे आणि त्यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 (SM6225) प्रोसेसर आहे. फोनला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यामध्ये 50MP मेन कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP B&W लेन्सचा समावेश आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 33W डार्ट चार्जला सपोर्ट करते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo