स्नॅपड्रॅगन 660 आणि 5030mAh च्या मोठया बॅटरी सह 360 N7 स्मार्टफोन झाला लॉन्च
हा डिवाइस मूनलाइट वाइट आणि ग्रेफाइट ब्लॅक रंगात विकत घेता येईल.
360 Mobiles ने आज चीन मध्ये आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. अनेक आठवड्यांच्या प्रतिक्षे नंतर 360 N7 स्मार्टफोन अधिकृतपणे लॉन्च झाला आहे. स्मार्टफोन मेटल बॅक आणि ग्लास फ्रंट दिला गेला आहे. हा हँडसेट दोन कलर वेरिएंट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि दोन्ही वेरिएंट्सना CNC फिनिश देण्यात आली आहे. हा डिवाइस मूनलाइट वाइट आणि ग्रेफाइट ब्लॅक रंगात विकत घेता येईल. याच्या वाइट वेरिएंट मध्ये कलर पॉवर बटन आहे. पॉवर बटन ब्राइट रेड कलर दिला गेला आहे जो डिवाइस मध्ये उठून दिसतो.
स्पेसिफिकेशन्स
360 N7 स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर आहे. हा सध्यातरी सर्वात पॉवरफुल मिड-रेंज चिपसेट आहे. डिवाइस 6GB रॅम आणि 64GB/128GB स्टोरेज वेरिएन्ट्स मध्ये उपलब्ध आहे. याच्या डिस्प्ले ची साइज 5.99 इंच आहे आणि याचा एस्पेक्ट रेश्यो 18:9 तर रेजोल्यूशन 2160 x 1080 पिक्सल आहे. डिवाइस 2.5D ग्लास ने सुरक्षित करण्यात आला आहे पण ही गोरिला ग्लास आहे की नाही हे स्पष्ट नाही.
कॅमेरा
कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचे तर डिवाइस च्या बॅक पॅनल वर 16MP f/2.0 + 2MP डुअल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे जो PDAF आणि LED फ्लॅश सह येतो. डिवाइस च्या फ्रंट फेसिंग कॅमेरा वर 8MP f/2.2 सेंसर आहे आणि हा फेस ब्यूटी ओप्टिमाइजेशन सह येतो.
किंमत
हा फोन अशा यूजर्स साठी बनवण्यात आले आहे जे जास्त वेळ मोबाईल गेम्स खेळतात. म्हणून डिवाइस मध्ये 5,030mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही क्विक चार्ज 3.0 (9V/2A फास्ट चार्जिंग) ला सपोर्ट करते. 360 N7 कंपनी च्या UI आणि सॉफ्टवेर ट्वीक्स सह एंड्राइड 8.1 ओरियो वर चालतो. डिवाइस मध्ये हाइब्रिड इंजन 2.0, गेम एक्सेलरेटर 2.0, एन्क्रिप्शन आणि लॉकिंग फीचर्स आहेत. 360 N7 च्या 64GB वेरिएंट ची किंमत ¥1699 (~$267) आणि 128GB वेरिएंट ची किंमत ¥1899 ($298) आहे.