हा फोन तीन नवीन प्रकारात लाँच होऊ शकतो. त्याचबरोबर ह्याच्या कॅमे-यामध्ये लेजर ऑटो फोकससुद्धा असू शकतो.
मोबाईल निर्माता कंपनी अॅप्पल लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन आयफोन 7 लाँच करण्याच्या तयारीत आहे. सध्यातरी कंपनी आपल्या ह्या स्मार्टफोनवर काम करत आहे. आतापर्यंत ह्या नवीन स्मार्टफोनविषयी बरीच माहिती समोर आली आहे आणि आता ह्या स्मार्टफोनविषयी आणखी एक नवीन खुलासा केला आहे. अॅप्पलने आपल्या ह्या नवीन डिवाइस आयफोन 7 तीन नवीन प्रकार लाँच करु शकते.
ह्याआधी अशी चर्चा होती की, आयफोन 7 दोन प्रकारात आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस रिलीज केला जाईल. दाखवलेला फोटो एक साइटवरुन घेण्यात आला आहे, ज्यात आयफोन 7 चा नवीन प्रकार दाखवला गेला आहे. ह्या वेरियंटचे नाव आयफोन 7 प्रो किंवा आयफोन 7 प्रो प्रीमियम असू शकतो. ह्याच्या तिस-या प्रकारावर सध्यातरी काम सुरु आहे. ह्या फोनला आयफोन यूजर्सच्या मागणीवरुन बनवले जात आहे.
ह्याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्याविषयी कोणतीही अधिक माहिती देण्यात आलेली नाही. जसे की आम्ही ह्याआधीच सांगितले आहे की, अँटिना बँडला डिवाइसच्या टॉप आणि बॉटम एजवर शिफ्ट केले जाऊ शकते. त्याचबरोबर ह्याच्या कॅमे-यामध्ये लेजर ऑटोफोकस असल्याचे सांगितले जातय. त्याशिवाय ह्यात 3GB रॅम असू शकते.