digit zero1 awards

200MP Camera Smartphones at Discount: लेटेस्ट स्मार्टफोनवर मिळतोय थेट तब्बल 8 हजार रुपयांचा डिस्काउंट

200MP Camera Smartphones at Discount: लेटेस्ट स्मार्टफोनवर मिळतोय थेट तब्बल 8 हजार रुपयांचा डिस्काउंट
HIGHLIGHTS

Amazon साइटवर बजेट-रेंजपासून प्रीमियम रेंजपर्यंत अनेक भारी पर्याय उपलब्ध

Amazon वर उपलब्ध असलेल्या सर्वोत्कृष्ट 200MP कॅमेरा स्मार्टफोन्स

ई-कॉमर्स दिग्गज HDFC कार्डद्वारे या फोनवर 8000 रुपयांची सवलत देत आहे.

जर तुम्ही फोटोग्राफीचे शौकीन असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी आम्ही तयार केला आहे. जर तुम्ही जबरदस्त कॅमेरा फोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी Amazon साइटवर बजेट-रेंजपासून प्रीमियम रेंजपर्यंत अनेक भारी पर्याय उपलब्ध आहेत. फोटोग्राफीचे शौकीन असलेले यूजर्स जबरदस्त डिस्काउंट ऑफरसह हे स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

 Amazon वर उपलब्ध असलेल्या सर्वोत्कृष्ट 200MP कॅमेरा स्मार्टफोन पर्यायांवर एक नजर घालुयात. पुढील सर्व स्मार्टफोन्सवर Easy EMI चा पर्याय देखील दिला जात आहे. त्याबरोबरच, अनेक विशेष ऑफर्स आणि सूट देखील उपलब्ध आहेत. 

Realme 11 Pro+ 5G

realme 11 pro+ 5g

Realme 11 Pro+ 5G फोन आकर्षक डिझाईनसह अलीकडेच लाँच करण्यात आला आहे. हा फोन 200MP पावरफुल कॅमेरासह येतो. या फोनचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 27,595 रुपयांना खरेदी करता येईल. तसेच, तुम्ही हा फोन 1,338 रुपयांच्या प्रारंभिक EMI पर्यायासह खरेदी करू शकता. या स्मार्टफोनवर 23,150 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Realme च्या या फोनमध्ये 120Hz वक्र डिस्प्ले, Mediatek Dimensity 7050 प्रोसेसर, 200MP कॅमेरा आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. खरेदी करण्यासाठी क्लिक करा 

Redmi Note 12 Pro+ 5G

redmi note 12 pro+ 5g

Redmi Note 12 Pro+ 5G फोनचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 29,500 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर, तुम्ही दरमहा 1,430 रुपये EMI भरून देखील ते खरेदी करू शकता. या स्मार्टफोनवर देखील 23,150 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. मात्र, एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या जुन्या किंवा विद्यमान फोनवर अवलंबून असेल. Redmi फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये 6.67 इंच FHD+ डिस्प्ले, Mediatek Dimensity 1080 प्रोसेसर, 200MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी आहे. खरेदी करण्यासाठी क्लिक करा 

Samsung Galaxy S23 Ultra 5G

samsung galaxy s23 ultra

कंपनीचा Samsung Galaxy S23 Ultra 5G फोन लोकप्रिय आहे, हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. Samsung Galaxy S23 Ultra 5G फोनचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 1,24,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ई-कॉमर्स दिग्गज HDFC कार्डद्वारे या फोनवर 8000 रुपयांची सवलत देत आहे. तसेच, तुम्ही हा फोन 6,061 रुपयांच्या प्रारंभिक EMI पर्यायासह घरी आणू शकता. याशिवाय फोनवर 40,050 रुपयांची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. खरेदी करण्यासाठी क्लिक करा 

 या सॅमसंग फोनमध्ये 120Hz डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर, 12GB RAM, 200MP कॅमेरा यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo