अगदी स्वस्तात खरेदी करा 108MP कॅमेरा असलेला Xiaomi फोन , मिळतेय तब्बल 19 हजार रुपयांची सूट

अगदी स्वस्तात खरेदी करा 108MP कॅमेरा असलेला Xiaomi फोन , मिळतेय तब्बल 19 हजार रुपयांची सूट
HIGHLIGHTS

Xiaomiचा Mi 11X Pro आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध

फोनवर मिळतेय तब्बल 19 हजार रुपयांपर्यंत सूट

6.67-इंच फुल HD + एमोलेड डॉट डिस्प्लेसह मिळतात अनेक जबरदस्त फीचर्स

Xiaomi च्या प्रीमियम स्मार्टफोन Xiaomi 11X Pro वर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. सध्या हा फोन Amazon India वर 19 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करता येईल. या सवलतीमध्ये SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर 10% म्हणजेच 1 हजार रुपयांची झटपट सूट देखील समाविष्ट आहे. डिस्काउंटनंतर फोनची किंमत 47,999 रुपयांवरून थेट 28,999 रुपयांवर आली आहे. या फोनची आतापर्यंतची ही सर्वात कमी किंमत आहे. एवढेच नाही तर कंपनी या फोनवर 13,950 रुपयांपर्यंतचे इन्स्टंट डिस्काउंट देखील देत आहे.

हे सुद्धा वाचा : हेल्थ आणि फिटनेसवर लक्ष ठेवण्यासाठी Amazfit चे नवीन स्मार्टवॉच लाँच, मिळेल 7 दिवसांची बॅटरी लाईफ

Xiaomi Mi 11X Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

फोनमध्ये कंपनी 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67-इंच फुल HD + एमोलेड डॉट डिस्प्ले देत आहे. डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश रेट आणि 360Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह येतो. 20:9 च्या आस्पेक्ट रेशो असलेल्या या डिस्प्लेमध्ये 1300 nits ब्राइटनेस आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी त्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देखील देत आहे.

हा Xiaomi फोन 8GB LPDDR5 रॅम आणि 128GB/256GB UFS 3.1 स्टोरेजसह येतो. प्रोसेसर म्हणून यात Adreno 660GPU सह Snapdragon 888 चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह तीन कॅमेरे देत आहे. यात 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्ससह 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 5-मेगापिक्सेल टेलीमॅक्रो सेन्सरचा समावेश आहे.

 कंपनीने सेल्फीसाठी या फोनमध्ये 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 4520mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचे झाले, तर हा फोन Android 11 वर आधारित MIUI 12 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5G, 4G, Wi-Fi 6, Bluetooth 5.2 आणि USB Type-C पोर्ट सारखे ऑप्शन्स देण्यात आले आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo