अप्रतिम ऑफर ! iPhone 13 वर मिळतेय 12,400 रुपयांची सूट, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध

अप्रतिम ऑफर ! iPhone 13 वर मिळतेय 12,400 रुपयांची सूट, ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध
HIGHLIGHTS

iPhone 13 वर मिळतेय तब्बल 12,400 रुपयांची सूट

ऑफलाइन स्टोअरमध्ये स्वस्तात मिळतोय iPhone 13

एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध

iPhone प्रेमींची संख्या कधीच कमी होत नाही. iPhone 13 एव्हरग्रीन स्मार्टफोन्सपैकी एक आहे. यामुळेच लोक स्मार्टफोनवर पैसे खर्च करताना iPhoneला प्राधान्य देतात. जर तुम्ही देखील iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे iPhone 13 खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.  iPhone 13 वर 12 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट मिळत आहे. जाणून घेऊया या ऑफरबद्दल सविस्तर माहिती… 

हे सुद्धा वाचा : उत्तम फीचर्ससह Vivo चा स्मार्टफोन आज भारतात होणार लाँच, किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी

ऑफलाइन स्टोअरमध्ये स्वस्तात  मिळतोय iPhone 13 

तुम्ही Imagine Apple Premium Reseller Store वरून iPhone 13 स्वस्तात खरेदी करू शकता. येथे तुम्हाला iPhone 13 वर 8,400 रुपयांची थेट सूट मिळत आहे. जर तुमच्याकडे HDFC बँकेचे कार्ड असेल तर तुम्हाला 4,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. अशा प्रकारे, तुम्हाला iPhone 13 च्या 128 GB स्टोरेज मॉडेलवर एकूण 12,400 रुपयांची सूट मिळू शकते. जर तुमच्याकडे जुना फोन उत्तम स्थितीत असेल, तर तुम्हाला 19,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील मिळेल, त्यानंतर फोनची किंमत केवळ 48,500 रुपये होईल.

iphone 13

iPhone 13 चे स्पेसिफिकेशन्स

iPhone 13 मध्ये 6 कोर CPU सह A15 बायोनिक प्रोसेसर आहे. याशिवाय यात 16 कोअर न्यूरल इंजिन आहे. Apple कधीही रॅम आणि बॅटरीबद्दल अधिकृत माहिती देत ​​नाही. iPhone 13 मध्ये 512 GB पर्यंत स्टोरेज उपलब्ध असेल. iPhone 13 मध्ये 1000 nits ब्राइटनेससह 6.1-इंच रेटिना XDR डिस्प्ले आहे.

iPhone 13 मध्ये 12-मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यावेळी एक नवीन वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा अपर्चर f/1.6 आहे. यासह सेन्सर ऑप्टिकल स्टॅबिलायझेशनसाठी सपोर्ट आहे. नाईट मोड पूर्वीपेक्षा उत्तम बनवण्यात आला आहे. दुसरी लेन्स 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड आहे, ज्यामध्ये ऍपर्चर f/2.4 आहे. फोनसह बॉक्समध्ये चार्जर उपलब्ध राहणार नाही.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo