Xiaomi ने मंगळवारी आपले दोन नवीन लॅपटॉप एकाच वेळी भारतात लाँच केले. ज्यामध्ये Xiaomi Notebook Pro 120G आणि Xiaomi Notebook Pro 120 सादर करण्यात आले आहेत. या लॅपटॉपला 120Hz रिफ्रेश रेट आणि ऍल्युमिनियम अलॉय बॉडी फिनिश डिझाइनसह 14-इंच स्क्रीन मिळते. लॅपटॉपमध्ये 12th Gen Intel Core i5 H-सिरीज प्रोसेसर आहे. तसेच, लॅपटॉपमध्ये 56Whr बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करण्यात आला आहे. जाणून घेऊयात त्यांचे फीचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन…
हे सुद्धा वाचा : नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत आहात ? 'या' वेअरेबल्सवर अप्रतिम ऑफर्स उपलब्ध
या लॅपटॉपमध्ये 14-इंच लांबीचा Mi-TrueLife डिस्प्ले आहे, जो 2.5K रिझोल्यूशन आणि 16:10 आस्पेक्ट रेशोसह येतो. यात 120Hz चा रिफ्रेश रेट आणि कमी ब्लु लाईट सर्टिफिकेशन सपोर्ट दिले गेले आहे. लॅपटॉपला Windows 11 सह 12th Gen Intel Core i5 H-सिरीज प्रोसेसर आणि Nvidia GeForce MX550 ग्राफिक्स कार्ड मिळते. तसेच 16 GB LPDDR5 RAM आणि 512 GB PCIe Gen 4 स्टोरेज उपलब्ध आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यात ड्युअल बँड Wi-Fi 6, ब्लूटूथ v5.2, थंडरबोल्ट 4 पोर्ट, HDMI 2.0, USB टाइप-C पोर्ट, USB टाइप-A पोर्ट आणि 3.5 मिमी कॉम्बो हेडफोन जॅकचा सपोर्ट आहे. तसेच यामध्ये 2W स्टिरीओ स्पीकर देखील उपलब्ध आहेत.
हा लॅपटॉप Xiaomi Notebook Pro 120G चा लाइट वर्जन मानला जाऊ शकतो. Xiaomi Notebook Pro 120 मध्ये 2.5K रिजोल्यूशनसह 14-इंच लांबीचा Mi-TrueLife डिस्प्ले देखील आहे. याला 12th Gen Intel Core i5 H-सिरीज प्रोसेसर देखील मिळतो, जरी या लॅपटॉपमध्ये इंटेल UHD ग्राफिक्स कार्ड आहे. या लॅपटॉपमध्ये Notebook Pro 120G चे सर्व पोर्ट देखील आहेत.
Xiaomi Notebook Pro 120G आणि Notebook Pro 120 एकाच सिल्व्हर कलरमध्ये सादर करण्यात आले आहेत. Xiaomi Notebook Pro 120G ची किंमत 74,999 रुपये आहे, तर Notebook Pro 120 ची किंमत 69,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे लॅपटॉप कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon India वरून खरेदी करता येतील.