Xiaomi चा पहिला 2-in-1 लॅपटॉप लाँच, उत्तम प्रोसेसरसह मिळेल 13 तासांपेक्षा जास्त काळ चालणारी बॅटरी
Xiaomi कडून Xiaomi Book S लॅपटॉप लाँच
कंपनीचा हा पहिला 2-in-1 लॅपटॉप होय.
हे डिवाइस एक टॅब म्हणून देखील वापरता येईल
Xiaomi चा पहिला 2-in-1 लॅपटॉप Xiaomi Book S लॉन्च झाला आहे. हे उपकरण एक टॅब म्हणून देखील वापरले जाऊ शकते. कंपनीने नुकताच हा लॅपटॉप युरोपमध्ये लाँच केला आहे. युरोपमध्ये त्याची किंमत 700 युरो म्हणजेच सुमारे 57,800 रुपये आहे. लाँच ऑफर अंतर्गत, कंपनी हा लॅपटॉप 600 युरो म्हणजेच 49,600 रुपये मध्ये खरेदी करण्याची संधी देत आहे. Xiaomi Book S लवकरच भारतात दाखल होईल, अशी माहिती मिळाली आहे. हा 2-इन-1 लॅपटॉप 12.4-इंच डिस्प्ले आणि 13.4 तासांपर्यंत बॅटरी लाइफसह येतो. चला तर जाणून घेऊयात या लॅपटॉपबाबत संपूर्ण माहिती…
हे सुद्धा वाचा : Tips and Tricks : iPhone वरून Android फोनवर चॅट बॅकअप 'अशा'प्रकारे ट्रांसफर करा
Xiaomi Book S 2-in-1 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
कंपनी या लॅपटॉपमध्ये 2560×1600 पिक्सेल रिझोल्यूशनसह 12.4 इंच LCD देत आहे. लॅपटॉपमध्ये आढळलेल्या स्क्रीनचा रीफ्रेश रेट 60Hz आहे. कंपनीचा हा पहिला 2-इन-1 लॅपटॉप स्लिम बेझल्सने सुसज्ज आहे आणि यामध्ये कंपनी 16:10 चा आस्पेक्ट रेशो देत आहे. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस लेव्हल 500 nits पर्यंत आहे. या लॅपटॉपचे वजन 720 ग्रॅम आहे आणि थिकनेस 8.95mm आहे.
हा लॅपटॉप कंपनीने ऍल्युमिनियम-मॅग्नेशियम अलॉयपासून बनवला आहे, ज्यामुळे त्याचा लूक खूपच प्रीमियम दिसतोय. Xiaomi Book S मध्ये फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॉलिंग आणि साउंडसाठी कंपनी ड्युअल स्पीकर सिस्टम देत आहे, ज्यामध्ये दोन मायक्रोफोन आहेत.
हा लॅपटॉप 8 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेजसह येतो. प्रोसेसर म्हणून, कंपनी यामध्ये Snapdragon 8cx Gen2 देत आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर कंपनी यामध्ये खूप पॉवरफुल बॅटरी देत आहे. ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर तब्बल 13.4 तास टिकेल, असा दावा केला जातो. वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी, तुम्हाला यामध्ये Wi-Fi 5 (ac) आणि Bluetooth 5.1 सारखे पर्याय मिळतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile