आपल्या लॅपटॉप श्रेणीचा विस्तार करत Xiaomi ने नवीन 2-in-1 लॅपटॉप Xiaomi Book Air 13 लाँच केला आहे. कंपनी याला आतापर्यंतचा सर्वात थिन आणि हलका लॅपटॉप असल्याचा दावा करत आहे. Xiaomi च्या या लॅपटॉपच्या Core i5 वेरिएंटची किंमत 4,999 युआन म्हणजेच सुमारे 57 हजार रुपये आहे आणि Core i7 व्हेरिएंटची किंमत जवळपास 63,800 रुपये आहे. यामध्ये दिलेली बॅटरीही खूप पॉवरफुल आहे. हे 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हे सुद्धा वाचा : खरंच ! Xiaomi ने भारतातील 'हा' व्यवसाय केला बंद, आता युजर्सना करता येणार नाही 'हे' काम
लॅपटॉपमध्ये कंपनी 2880×1800 पिक्सेल रिझोल्यूशनसह 13.3-इंच लांबीचा E4 OLED डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 600 nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हल आणि 60Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्ले कॉलिटीसाठी कंपनी त्यात डॉल्बी व्हिजन आणि VESA डिस्प्ले देत आहे. लॅपटॉपच्या थिन बेझल्समुळे ते खूप प्रीमियम दिसते. 2-इन-1 डिझाइन लॅपटॉपमध्ये 360-डिग्री बिजागर आहे. यासोबतच कंपनी यामध्ये टच सपोर्ट देखील देत आहे, ज्यामुळे हा लॅपटॉप वापरण्याचा अनुभव खूप उत्तम होणार आहे.
1.2kg वजनाच्या या लॅपटॉपमध्ये 16GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 512GB SSD स्टोरेज आहे. Intel Iris Xe GPU ने सुसज्ज असलेल्या या लॅपटॉपमध्ये 12th Generation Intel Core i7 पर्यंत प्रोसेसर पर्याय आहे. लॅपटॉपमध्ये कंपनी ड्युअल युनिट मायक्रोफोनसह मजबूत ऑडिओसाठी ड्युअल स्पीकर सिस्टम ऑफर करत आहे, जे डॉल्बी ATMOS साउंडला समर्थन देते.
Xiaomi चा हा नवीनतम लॅपटॉप बॅकलिट कीबोर्ड आणि ग्लास टचपॅडसह येतो. याशिवाय पॉवर बटनमध्ये इंटिग्रेटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे. कॉलिंगसाठी कंपनी लॅपटॉपमध्ये 8-मेगापिक्सेल कॅमेरा देत आहे. लॅपटॉपमध्ये दिलेली बॅटरी 58.3WHr आहे, जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने हा लॅपटॉप नुकताच चीनमध्ये लॉन्च केला आहे. येत्या काही दिवसांत तो भारतातही लॉन्च केला जाऊ शकतो.