HP ने भारतात आपला जगातील सर्वात पातळ लॅपटॉप HP Spectre लाँच करण्याची पुर्ण तयारी केली आहे. हा लॅपटॉप आज भारतात लाँच केला जाऊ शकतो. कंपनीने ह्यासाठी मिडिया इनवाइट पाठवणे सुरु केले आहे. ह्यात लिहिले आहे की, “चला अनुभव घ्या एक नवीन तंत्रज्ञानाचा.” तसेच HP ने ट्विट करुनसुद्धा ही माहिती दिली आहे.
ह्या लॅपटॉपमध्ये AAA बॅटरी वापरली आहे. ह्याची जाडी १०.४ mm आणि वजन २.४५ पाउंड्स (जवळपास १.१ किलोग्रॅम) आहे. हा अॅल्युमिनियम आणि कार्बन फायबर बॉडीसह येतो. Spectre 13 मध्ये 13.3 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली आहे. ह्या लॅपटॉपचे डिझाईन खूपच आकर्षक आहे. ह्यात हाय-एन्ड फर्निचर वापरण्यात आले आहे. त्याचबरोबर ह्याच्या किबोर्डमध्ये बॅकलिट किजसुद्धा आहेत. ह्यात एक ग्लास ट्रॅकपॅड आणि तीन USB टाइप-C पोर्ट्स दिले गेले आहेत. लॅपटॉपमध्ये 8GB ची रॅम आणि 512GB चे SSD स्टोरेज दिले गेले आहे आणि ह्यात इंटेल कोर i5/i7 प्रोसेसरमध्ये कोणत्याही एकाला निवडण्याचे पर्याय मिळेल.
हेदेखील वाचा – क्षणार्धात डेटा ट्रान्सफर करणारे हे आहेत काही महत्त्वपुर्ण आणि लोकप्रिय अॅप्स…
लॅपटॉपला थंड ठेवण्यासाठी HP ने इंटेल हायपरबेरीक कूलिंग टेक्नॉलॉजी वापरली आहे. जी न केवळ गरम हवेला बाहेर काढते तर थंड हवा सुद्धा देते. HP Spectre 13 लॅपटॉप Bang & Olufsen ऑडियो टेक्नॉलॉजीसह येईल. ह्या डिवाइसची किंमत $1,169 (जवळपास ७८,००० रुपये) आहे.
हेदेखील वाचा – सॅमसंग गॅलेक्सी J3 V स्मार्टफोन लाँच, सुपर AMOLED HD डिस्प्लेने सुसज्ज
हेदेखील वाचा – वनप्लस 3 चा सॉफ्ट गोल्ड व्हर्जन जुलैमध्ये होणार विक्रीसाठी उपलब्ध