JioBook launch in India: बहुप्रतिक्षित रिलायन्स लॅपटॉप अखेर भारतात लाँच, किंमत अगदी तुमच्या बजेटमध्ये

JioBook launch in India: बहुप्रतिक्षित रिलायन्स लॅपटॉप अखेर भारतात लाँच, किंमत अगदी तुमच्या बजेटमध्ये
HIGHLIGHTS

अखेर रिलायन्स कंपनीने बहुप्रतिक्षित नवीन JioBook लाँच केले आहे.

कंपनीने JioBook लॅपटॉप किंमत फक्त 16,499 रुपये आहे.

या लॅपटॉपची सेल 5 ऑगस्ट 2023 पासून सुरू होणार आहे.

मागील काही दिवसांपासून JioBook या कमी किमतीच्या लॅपटॉपची बरीच चर्चा सुरु होती. त्यानंतर अखेर रिलायन्स कंपनीने बहुप्रतिक्षित नवीन JioBook लाँच केले आहे. हे कंपनीचे नवीनतम परवडणारे लॅपटॉप मॉडेल आहे. चला तर मग बघुयात लॅपटॉपची डिझाईन, किंमत आणि इतर तपशील. 

डिझाईन

हा लॅपटॉप मॅट फिनिश डिझाइन, अल्ट्रा-स्लिम आणि 990 ग्रॅम वजनाचा आहे. तुम्ही हा लॅपटॉप सहज कुठेही कॅरी करू शकता. हा लॅपटॉप 11.6 इंच HD डिस्प्ले सह येतो. हे JioOS ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. यात 4G आणि ड्युअल-बँड वाय-फाय कनेक्टिव्हिटी आहे. 

किंमत आणि उपलब्धता 

कंपनीने JioBook लॅपटॉप किंमत फक्त 16,499 रुपये आहे. या लॅपटॉपची सेल 5 ऑगस्ट 2023 पासून सुरू होणार आहे. हा लॅपटॉप कंपनीच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्स आणि Amazon India वरून खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. Amazon मधून लॅपटॉप खरेदी केल्यास HDFC बँक कार्डद्वारे लॅपटॉपवर 4000 रुपयांपर्यंतची झटपट सूट देत आहे.

 JioBook चे संपूर्ण तपशील 

JioBook 2023 मॉडेल 11.6-इंच लांबीच्या अँटी-ग्लेअर HD डिस्प्लेसह येतो. याशिवाय, हा लॅपटॉप Mediatek MT 8788 Octa Core प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 4GB LPDDR4 रॅम आणि 64GB स्टोरेज उपलब्ध आहे. या प्रोसेसरसह तुम्हाला हाय परफॉर्मन्सचा अनुभव मिळणार आहे. लॅपटॉपचे स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येते. 

लॅपटॉपमध्ये इन्फिनिटी कीबोर्डसह मल्टी-जेश्चर ट्रॅकपॅड आहे, जो तुमचा ब्राउझिंग आणि टायपिंगचा अनुभव उत्कृष्ट बनवेल, असे सांगण्यात आले आहे. याशिवाय वापरकर्त्यांना या लॅपटॉपसह Digiboxx वर 100GB मोफत क्लाउड स्टोरेज मिळत आहे. ही सुविधा 1 वर्षासाठी वैध असणार आहे. कंपनीचा दावा आहे की हा लॅपटॉप एका चार्जवर 8 तासांपर्यंत वापरतो.

कॅमेरा 

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी, लॅपटॉपमध्ये 2MP HD वेबकॅम आहे, ज्यामध्ये स्टिरीओ साउंड समर्थित आहे. ऑनलाइन क्लासेस करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, अधिकृत वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी आणि मनोरंजनासाठी हे फिचर योग्य ठरेल, असा कंपनीचा दावा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo