जबरदस्त फीचर्ससह Reliance JioBook लॅपटॉप भारतात लाँच, किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी
Reliance JioBook लॅपटॉप भारतात लाँच
JioBook लॅपटॉपची किंमत 19,500 रुपये
सध्या लॅपटॉप केवळ सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध
भारतीय दूरसंचार कंपनी रिलायन्स Jio कडून स्वस्त लॅपटॉप लाँच करण्याचे संकेत 2021 च्या सुरुवातीपासून मिळत होते आणि आता कंपनीने गपचूपणे तो लाँच केला आहे. परवडणारा लॅपटॉप Reliance JioBook हा अतिशय कमी किमतीत लाँच करण्यात आला आहे, जेणेकरून अधिकाधिक वापरकर्त्यांना त्याचा लाभ घेता येईल. त्याची झलक दिल्लीतील प्रगती मैदानावरील इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) 2022 च्या कार्यक्रमातही पाहायला मिळाली.
Jiobook लॅपटॉपची किंमत
JioBook लॅपटॉपची किंमत 19,500 रुपये आहे आणि सरकारी ई-मार्केटप्लेसमधून खरेदी करता येईल. मात्र, सध्या हा लॅपटॉप केवळ सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. लीक्सनुसार, दिवाळीनंतर इतर ग्राहकांनाही हा स्वस्त लॅपटॉप खरेदी करण्याचा पर्याय मिळेल.
हे सुद्धा वाचा : Brahmastra Box Office: 'ब्रह्मास्त्र'ने जगभरात घातला धुमाकूळ, बजेटपेक्षा जास्त कमाई
Jiobook लॅपटॉपचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
JioBook लॅपटॉप गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) वर विक्रीसाठी सूचीबद्ध करण्यात आला आहे. हे डिव्हाइस अशा वापरकर्त्यांसाठी डिझाइन केले गेले आहे, ज्यांना मर्यादित बजेटमध्ये लॅपटॉप खरेदी करायचा आहे. JioBook ला प्लॅस्टिक बॉडीमध्ये लॉन्च केले गेले आहे आणि बॅक पॅनल व्यतिरिक्त कीबोर्डवर Jio ब्रँडिंग देण्यात आले आहे. तसेच इन-बिल्ट 4G LTE सपोर्ट यात मिळू शकतो, अशी माहिती मिळाली आहे.
डिव्हाइस 1366×768 HD रिझोल्यूशनसह 11.5-इंच TN डिस्प्लेसह येतो. हा लॅपटॉप क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 चिपसेटद्वारे समर्थित आहे आणि त्यात Adreno 610GPU आहे. यात 2GB LPDDR4X रॅम असून 32GB इनबिल्ट स्टोरेज उपलब्ध आहे.
ड्युअल स्पीकर सेटअप व्यतिरिक्त, डिव्हाइसमध्ये ड्युअल मायक्रोफोन आणि हेडसेटसाठी टू-इन-वन कॉम्बो पोर्ट आहे. यात USB 2.0 पोर्ट, USB 3.0 पोर्ट आणि HDMI पोर्ट आहे. WiFi 802.11ac, ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटी व्यतिरिक्त, मायक्रो SD कार्ड सपोर्ट उपलब्ध आहे. हा लॅपटॉप JioOS ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile