4G फीचर फोन नंतर आता हा प्रोडक्ट लॉन्च करून लोकांना नवीन भेट देऊ शकते रिलायंस जियो

Updated on 12-Apr-2018
HIGHLIGHTS

काही रिपोर्ट्स वरून असे समोर येत आहे की रिलायंस जियो आपल्या 4G फीचर फोन जियो फोन च्या लॉन्च नंतर आता एक लॅपटॉप लॉन्च करू शकते जो सिम कार्ड सह तुमच्या बजेट मध्ये येईल.

काही रिपोर्ट्स वरून असे समोर येत आहे की रिलायंस जियो आपल्या 4G फीचर फोन जियो फोन च्या लॉन्च नंतर आता एक लॅपटॉप लॉन्च करू शकते जो सिम कार्ड सह तुमच्या बजेट मध्ये येईल. असे पण समोर येत आहे की यासाठी रिलायंस जियो US बेस्ड चिप निर्माता कंपनी क्वालकॉम सोबत चर्चा करत आहे. 
हा लॅपटॉप विंडोज 10 सह लॉन्च केला जाऊ शकतो आणि यात बिल्ट-इन सेलुलर कनेक्शन पण असेल, जो याला भारतीय बाजारातील एक अनोखा प्रोडक्ट बनवेल. याव्यतिरिक्त या दोन्ही कंपन्या आधीच एक 4G फीचर फोन बाजारात आणण्यासाठी एकत्र काम करत आहेत. 
या जियो फोन बद्दल बोलायचे झाले तर हे एक मोठे पाऊल होते, कारण या डिवाइस च्या लॉन्च नंतर मोबाईल जगत जणू नवीन क्रांति आली. या फोनला भारतात मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शविण्यात आली. यात व्हाट्सॅप चालत नसल्याने याची प्रसिद्धी काही प्रमाणात कमी झालेली, पण आता समोर येत आहे की या फोन मध्ये व्हाट्सॅप पण लवकरच वापरता येईल. 
आता जर कंपनी अशा प्रकारच्या लॅपटॉप बद्दल चर्चा करत असेल तर आता तुम्हीच अंदाज लावा की कशी खळबळ निर्माण होणार आहे ती. त्यातच हा डिवाइस सेलुलर क्षमता सह लॉन्च केला गेला तर याचा मोबाईल जगावर पण याचा एक मोठा प्रभाव पडेल. याची किंमत पाहता हा डिवाइस सर्वांच्या बजेट मध्ये लॉन्च केला गेला तर इतर कंपन्यांचे काही खरे नाही. 
पण अधिकृतपणे याबद्दल काहीही स्पष्ट झालेले नाही, याची अधिकृत माहिती अजून तरी देण्यात आली नाही. पण जर बातमीची सुरवात झाली आहे तर येणार्‍या काळात अजून बातम्या येतील आणि चित्र स्पष्ट होईल. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :