RDP एक भारतीय IT हार्डवेअर आणि मोबाईल निर्माता कंपनी आहे आणि आज ह्याने आपला नवीन RDP थिनबुक संपुर्ण भारतात लाँच केला आहे, ज्याची किंमत ९,९९९ रुपये आहे.
हा बजेट लॅपटॉप विंडोज १० वर चालतो. ह्यात १४.१ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्याचे वजन केवळ १.४५ किलो आहे. त्याशिवााय ह्याच्या स्क्रीन रिजोल्युशनविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 1366x768p आहे. ह्यात आपल्याला 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा मिळत आहे, ज्याला आपण 128GB पर्यंत वाढवू शकतो.
हेदेखील पाहा – Xolo One HD Review – झोलो वन HD रिव्ह्यू
ह्यात आपल्याला इंटेल एटम X5-Z8300 प्रोसेसर आणि 2GB रॅम मिळत आहे. ह्यात एक 10000mAh क्षमतेची बॅटरीसुद्धा मिळत आहे, जी कंपनीनुसार, ८.५ तासांचा बॅकअप टाइम आणि ४-५ तासांचा वायफाय सपोर्ट देते.
हेदेखील वाचा – १५,००० च्या किंमतीत येणारे जबरदस्त कॅमेरा स्मार्टफोन्स (जुलै २०१६)
ह्यात आपल्याला ब्लूटुथ 4.0 सह वायफायसुद्धा दिला आहे. ह्यात आपल्याला एक HDMI पोर्ट, एक ऑडियो पोर्ट, एक USB 3.0 पोर्ट, एक USB 2.0 पोर्ट आणि VGA कॅमेरासह ड्यूल HD स्पीकर्ससुद्धा मिळत आहे.
हेदेखील वाचा – एअरटेल, आयडियानंतर आता वोडाफोननेही ६७% वाढवला आपल्या डाटा पॅक्सचा फायदा
हेदेखील वाचा – Prisma App मध्ये लवकर येणार व्हि़डियो एडिटिंग फिचर