जूनमध्ये लाँच झालेला हा लॅपटॉप भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
RDP ने अलीकडेच आपला नवीन लॅपटॉप थिन बुक लाँच केला. ह्या लॅपटॉपची किंमत ९,९९९ रुपये आहे. मागील महिन्यात ह्या लॅपटॉपसाठी प्री-बुकिंग करण्यात आली होती. मात्र आता हा लॅपटॉप विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. हा RDP च्या ऑफिशियल साइटवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
ह्यात 14.1 इंचाची डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1366×768 पिक्सेल आहे. हा डिवाइस इंटेल क्वाड-कोर प्रोसेसर आणि 2GB ची रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. ह्या स्टोरेजला 256GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. हा लॅपटॉप कंपनीच्या वेबसाइटवरुन प्री-ऑर्डर केला जाऊ शकतो.
कंपनीचा दावा आहे की, ह्या किंमतीमध्ये हा जगातील सर्वात पातळ लॅपटॉप आहे. ह्यात 10000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हा विंडोज 10 वर आधारित आहे. ह्यात एक वेब कॅमेरा आणि ब्लूटुथ 4.1 फीचरसुद्धा मिळत आहे.