RDP ने आपला नवीन लॅपटॉप थिन बुक लाँच केला आहे. ह्याची किंमत ९,९९९ रुपये आहे. ह्यात 14.1 इंचाची डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1366×768 पिक्सेल आहे. हा डिवाइस इंटेल क्वाड-कोर प्रोसेसर आणि 2GB ची रॅमने सुसज्ज आहे.
ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिली आहे. ह्या स्टोरेजला 256GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. हा लॅपटॉप कंपनीच्या वेबसाइटवरुन प्री-ऑर्डर केला जाऊ शकतो.
हेदेखील पाहा – 3GB रॅमसह येणारे १० बजेट स्मार्टफोन्स
कंपनीचा दावा आहे की, ह्या किंमतीमध्ये हा जगातील सर्वात पातळ लॅपटॉप आहे. ह्यात 10000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हा विंडोज 10 वर आधारित आहे. ह्यात एक वेब कॅमेरा आणि ब्लूटुथ 4.1 फीचरसुद्धा मिळत आहे.
कंपनी ह्या लॅपटॉपची प्री-बुकिंगवर 16GB चे SD कार्ड मोफत देत आहे. कंपनीला आतापर्यंत 1K प्री- बुकिंग मिळाली आहे.
हेदेखील वाचा – लेनोवोच्या प्रोजेक्ट टँगोवर आधारित असलेला PHAB 2 प्रो स्मार्टफोन लाँच
हेदेखील वाचा – Envent LiveFree 570, 530 वॉटरप्रूफ ब्लूटुथ स्पीकर्स लाँच, किंमत अनुक्रमे ३९९९ रुपये, २४९९ रुपये