भारतीय कंपनी Notion Ink ने बाजारात आपला नवीन टू-इन-वन लॅपटॉप Able 10 लाँच केला आहे. हा लॅपटॉप विंडोज 10 ने सुसज्ज आहे. ह्याला ऑनलाइन शॉपिंग साइट स्नॅपडिलवर खरेदी केला जाऊ शकतो. कंपनीने भारतीय बाजारात आपल्या ह्या डिवाइसची किंमत २४,९९० रुपये ठेवण्यात आली आहे.
ह्या स्क्रीनचा आकार 10.1 इंच आहे आणि हा एक IPS डिस्प्ले आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1280×800 पिक्सेल आहे. ह्यात 2 मेगापिक्सेलचा रियर आणि फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे. हा USB 3.0 पोर्ट, मायक्रो-USB 2.0 पोर्ट आणि मायक्रो HDMI स्लॉटसह दिला आहे.
हा क्वाड-कोर इंटेल चेरी ट्रेल प्रोसेसर आणि 4GB रॅमने सुसज्ज असेल. ह्यात 64GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. ह्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.
हेदेखील वाचा – भारतीय बाजारात सर्वाधिक विकले गेलेले हे नोकियाचे जबरदस्त फोन्स…
हा 3G, वायफाय, ब्लूटुथ v4.0 सारख्या कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहे. ह्यात 8100mAh ची बॅटरी दिली आहे. ह्याचे वजन ६५५ ग्रॅम आहे. हा लॅपटॉप एक किबोर्डसह येतो.
हेदेखील वाचा – तुमच्या मोबाईल इंटरनेटचा स्पीड माहित करुन घेण्यासाठी वापरा हा MySpeed App
हेदेखील वाचा – एसर ट्रॅवलमेट X349 लॅपटॉप लाँच, 8GB रॅमने सुसज्ज